Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनNavri Mile Hitlerla : काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाचं प्रेमाचं नातं

Navri Mile Hitlerla : काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाचं प्रेमाचं नातं

Subscribe

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे. मालिकेतील एजे आणि लीलामध्ये प्रेमाचं नातं बहारतंय. हे पाहायला प्रेक्षकांना फार मजा येतेय. लीलाचे हट्ट आणि एजेचं शिस्तीतलं प्रेम असं एक हटके कॉम्बिनेशन या मालिकेत पहायला मिळतंय. दरम्यान, एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल? यासाठी तो प्रयत्नशील आहे. (Navri Mile Hitlerla fame vallari viraj expressed her experience of shoot in kashmir)

लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज हवंय. जसं जिमी शेरगील रिषितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसं. लीलाच म्हणणं आहे की, जसं आपलं नातं युनिक आहे तसं प्रपोजलही युनिकच हवं. प्रेमात असंच असत इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात. तिची दुसरी इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं जिथे छान बर्फ असेल आणि बर्फामध्ये उभं राहून रोमँटिक डान्स करायचा आहे. तिला एक मस्त शिकारा राईडसुद्धा करायची आहे. लीलाच्या या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे. कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


या सगळ्या शूट बाबत लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने आपला अनुभव व्यक्त केलाय. ती म्हणाली, ‘आम्ही शूटसाठी काश्मीरला गेलो होतो. तिथे आम्ही ४ दिवस शूट केलं. निसर्गमय बर्फाच्या चादर ओढलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले. जसं गुलमर्ग आणि श्रीनगर. तिकडे शूटिंग करणं इतकं सोपं नव्हतं. कारण, प्रचंड थंडी होती. पण बर्फात शूट करायची मज्जा काही वेगळीच होती. आम्ही गुलमर्गला बर्फात एजे- लीलाचा प्रपोजल सीन शूट केला. गुलमर्गमध्ये बर्फात साडी नेसून एक गाणं ही शूट केलं गेलं. हा माझ्यासाठी मोठा टास्क होता’.

‘मला साडीत खुप थंडी वाजत होती. मी पूर्ण वेळ कुडकुडत होते. जसा सीन कट होत होता मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होतं. खासकरून ‘नवरी मिळे हिटलरला’ची जी क्रिएटिव्ह आहे मनाली.. तिने माझी अतिशय काळजी घेतली. एजे म्हणजेच राकेश बापटनेही मला खूप सपोर्ट केलं. पण जेव्हा मी ते स्क्रीनवर पाहिलं माझी उत्सुकता तेव्हढीच वाढत गेली. आम्ही दललेकला शिकारामध्ये बसूनही शूट केलं. तो ही एक छान अनुभव होता. हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहील’.

हेही पहा –

100th Marathi Natya Sammelan : 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात