Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनNavri Mile Hitlerla : एजेच्या प्रपोजसाठी लीला उपोषण करणार

Navri Mile Hitlerla : एजेच्या प्रपोजसाठी लीला उपोषण करणार

Subscribe

झी मराठीची मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील मुख्य पात्र अर्थात लीला आणि एजे प्रेक्षकांना प्रचंड भावले आहेत. सध्या या मालिकेतील गोड गुलाबी क्षण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. एजे आणि लीलाच्या नात्यात होणारे बदल, त्यांच्यात वाढणारी जवळीक पाहता ते एकत्र कधी येणार? याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. व्हेलेंटाईन डे अगदी तोंडावर असताना मालिकेत एजेने आपल्याला प्रपोज करावं म्हणून लीला शक्कल लढवताना दिसणार आहे. अगदी उपोषणावर उतरण्याची लीलाने तयारी दाखवली आहे. (Navri Mile Hitlerla Marathi Serial On Interesting Mode)

लीलाचा अनोखा हट्ट एजे पुरवणार?

एजेने आपल्याला प्रपोज करावं म्हणून लीला आता उपोषणाला बसणार आहे. एजेने आपल्याला प्रपोज करावा असा लीलाचा हट्ट आहे. एजेच्या मनात लीलाविषयी प्रेम असलं तरीही प्रपोज करण्याची त्याची तयारी नसताना आता लीलाला सासूबाईंची साथ मिळणार आहे. दरम्यान, एजे लीलाने केलेलं उपोषण मोडण्यासाठी तिचा आवडता नाष्टाही बनवतोय. पण काही केल्या लीला उपोषण सोडत नाही. सूना लीलावर बारीक लक्ष ठेवून आहेत. शेवटी एजे स्वतः उपाशी राहण्याचा निश्चय करतो, आता मात्र लीलाचा नाईलाज होतो. पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


‘ती एजेला म्हणते मला प्रपोज करावंच लागेल. पण एजेच्या मनात खंत आहे की जी गोष्ट अंतरासोबत झाली ती लीलासोबत होऊ नये, म्हणून तो अंतराच्या फोटोजवळ जाऊन त्याच्या मनातली भीती बोलून दाखवतो की जेव्हा जेव्हा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा ती व्यक्ती त्याच्यापासून दुरावली आहे. लीलाला त्याला गमवायचं नाहीये. पण लीलाचा हट्ट म्हणून एजे फायनली तिला विचारतो नक्की तुला कसं प्रपोजल हवं आहे. तेव्हा लीला त्याला एकदम फिल्मी स्टाईल ग्रँड प्रपोजलच्या करून दाखवा असं सांगते. त्याच दरम्यान किशोर लीलाला जीवे मारण्याचा प्लॅन बनवतोय, त्यासाठी तो एजे आणि लीलाच्या मागे माणसं पाठवतो. आता एजे फिल्मी स्टाईल प्रपोज करू शकेल, की खरंच एजेच्या मनातील भीती खरी ठरेल ? यासाठी मालिकेचे आगामी भाग पहावे लागतील.

हेही पहा –

Vidula Chougule : सप्तसुरच्या शंभराव्या गाण्यात झळकली विदुला चौगुले