घरमनोरंजनचित्रपटापेक्षा नवाजची आरएसएसच्या कार्यक्रमाला पसंती

चित्रपटापेक्षा नवाजची आरएसएसच्या कार्यक्रमाला पसंती

Subscribe

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या आगामी मंटो या चित्रपटाच्या प्रीमियरला डावलून दिल्लीतील आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावले पसंत केले. त्यानंतर मुंबईत असलेल्या स्पेशल स्क्रीनिंगला नवाजने उपस्थिती दर्शवली.

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या आगामी ‘मंटो’ या चित्रपटाच्या प्रीमियरच्या कार्यक्रमापेक्षा राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमाला जाणं पसंत केला. दिल्लीमध्ये आरएसएसने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी मुंबईत ‘मंटो’ चित्रपटाच्या प्रीमियरचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर दुसरीकडे दिल्लीत आरएसएसचा कार्यक्रम होता. एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम आयोजित केल्यामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आधी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणे पसंत केले. या कार्यक्रमाला बराच वेळा नवाजुद्दीन उपस्थित होता. यावेळी त्याने संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली आणि संपूर्ण कार्यक्रमात तो भागवतांसोबत बसला होता.

नवाजसाठी पाहुणे थांबून राहिले

नवाजु्द्दीन आरएसएसचा कार्यक्रम संपवून मुंबईसाठी रवाना झाला. दिल्लीला गेल्यामुळे नवाज ‘मंटो’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी उशीरा पोहोचला. या चित्रपटात नवाज प्रमुख भूमिकेत असून त्याच्या अनुपस्थितीमुळे चांगलाच खोळंबा झाला. कित्येक पाहुणे नवाजची वाट पाहत थांबून राहिले. मंटो हा सुप्रसिद्ध लेखक-पत्रकार सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट आहे. अभिनेत्री आणि लेखिका नंदिता दास हिने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

- Advertisement -

आरएसएसच्या कार्यक्रमाला बॉलीवूड कलाकार

दिल्लीमध्ये आरएसएसचा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसह इतरही बॉलीवूडकर्मींनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये अनु मलिक, मनीषा कोईराला, अन्नू कपूर आणि मधुर भांडारकर सारखे सिनेकर्मी हजर होते. तर मंटोच्या स्पेशल स्क्रिनिंगलाही बॉलीवूडच्या कलाकारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. अभिनेत्री नंदिता दाससह रेखा, ईला अरुण, लिलेट दुबे. राहुल बोस आणि इम्तियाज अली आदींनी ‘मंटो’च्या प्रीमियरला हजेरी लावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -