Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन नवाजुद्दीन सिद्दीकी करतो स्वतःच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; ऑडियो रेकॉर्डिंग शेअर करत भावाने केला...

नवाजुद्दीन सिद्दीकी करतो स्वतःच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; ऑडियो रेकॉर्डिंग शेअर करत भावाने केला खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील अनेक दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीचे वैवाहिक जीवन कठीण टप्प्यातून जात आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात सतत अनेक वादविवाद सुरु आहेत. फक्त पत्नीच नव्हे तर नवाजुद्दीनचा भाऊ देखील त्याच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहे. नवाजुद्दीनचा भाऊ शमास सिद्धीकीने ट्वीटर अकाऊंटवर एक ऑडियो रेकॉर्डिंग रिलीज केली आहे. ज्यात तो नवाजुद्दीनच्या मॅनेजरसोबत फोनवरील चर्चा करत आहे.

हा ऑडियो रेकॉर्डिंग शेअर करत शमासने ट्वीट केलंय की, “होळीची भेटवस्तू म्हणून हा व्हिडीओ मिळाला. नेहमीप्रमाणे नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. त्याचा मॅनेजर सांगत आहे की, त्याने मुलाला दुसऱ्यांदा मारलं. त्या गाढवाला एअरपोर्ट आणि ऑफिसमध्ये देखील मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ लवकरच रिलीज करण्यात येईल. महान व्यक्ती”

- Advertisement -

व्हिडीओमध्ये शमास एका व्यक्तीला म्हणतो की, “यार मला अवधेशने सांगितलं, त्यांनी मोनूला पुन्हा मारलं आहे? पुढे तो त्या व्यक्तीला कधी मारलं असं विचारतो. त्यावर तो जेव्हा सकाळी-सकाळी शूट होत त्यावेळी सकाळी दोन कानाखाली मारल्या होत्या. असं सांगतो. यावर शमास सांगतात की, ही खूप चूकीची गोष्ट आहे. मी माझ्याकडून त्याच्याशी बोलेन” असं शमास म्हणाला.

 


- Advertisement -

हेही वाचा :

हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिता सेनने केली वर्कआऊटला सुरुवात; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

- Advertisment -