नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मोलकरणीचा VIDEO VIRAL, दुबईच्या घरात मदतीसाठी आक्रोश

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय.

Nawazuddin Siddiqui

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर आता त्याच्या मोलकरणीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये मोलकरीण अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबईच्या घरात मदतीसाठी ओक्साबोक्शी रडताना दिसून आली.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा वकील रिजवानने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक स्टेटमेंटही जाहीर केलंय. यात नवाजने त्याची मोलकरीण सपनाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगण्यात आले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने सपनाचा दुबईतील रेकॉर्डमध्ये एका अज्ञात कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून उल्लेख केला असल्याचा दावा देखील केलाय. प्रत्यक्षात नवाजुद्दीन सिद्दीकीने सपनाला मुलांची काळजी घेण्यासाठी ठेवले होते. काही काळापूर्वी आलिया सिद्दीकी मुलांसह भारतात परतली, मात्र मोलकरीण सपना तिथेच राहिली. त्यानंतर आता तिने व्हिडीओद्वारे मदतीची याचना केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सपना म्हणताना दिसत आहे की, ‘मी सपना बोलत आहे. मी नवाजुद्दीन सरांच्या घरी अडकले आहे. मॅडम गेल्यावर सरांनी मला व्हिसा दिला होता. माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापले जात आहेत. मला दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे मला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीदी नुकतीच गेली, तिलाही खूप अडचणी येत होत्या. त्यांना भारतातही जाऊ दिले नाही. तीही मोठ्या मुश्किलने भारतात पोहोचली आहे. सध्या मी इथे एकटी आहे. माझ्याकडे खायलाही पैसे नाहीत. मी तुम्हाला विनंती करते की, मला येथून बाहेर काढा आणि मला माझा पगार हवा आहे. मला माझ्या घरी भारतात जायचं आहे. मला जाण्यासाठी तिकीट आणि पगार हवा आहे. ही विनंती मी तुमच्यासमोर करत आहे.”

एकंदरीत या व्हिडीओनंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याला मुंबईच्या अंधेरी कोर्टाने पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून नोटीस बजावली आहे.