Nawazuddin Siddiqui House: नवाजुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत आलिशान बंगला, ३ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती

संपूर्ण घराला व्हाइट कलर देण्यात आला आहे. बंगल्याबाहेर अनेक झाडे लावण्यात आली आहेत. बंगल्याबाहेर बसण्यासाठी मोकळी जागा करण्यात आली आहे. बंगल्याच्या एंट्रीला लाकडी ट्रेडिशनल डिझाइनचे दरवाजे करण्यात आले आहेत.

Nawazuddin Siddiqui luxurious bungalow in Mumbai
Nawazuddin Siddiqui House: नवाजुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत आलिशान बंगला, ३ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)  असा अभिनेता आहे जो सतत त्याच्या उत्तम सिनेमा आणि त्यातील भूमिकांमुळे चर्चेत असतो. नवाजुद्दीन पुन्हा एकदा चर्चेत आला असून ही चर्चा त्याच्या आगामी सिनेमाची नसून त्याच्या नव्या आलिशान घराची आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतेच मुंबईत स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. (Nawazuddin Siddiqui luxurious bungalow in Mumbai) मुंबईत आलिशान घर त्याने विकत घेतले असून घराचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. घराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे घर केवळ एक बंगला नाही तर राजवाड्यासारखे आहे. नवाजुद्दीने सिद्दीकीने स्वत: या घराचे डिझाइन केले आहे.

३ वर्षांनंतर स्वप्नपूर्ती

मागच्या काही वर्षात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सातत्याने सिनेमात काम करत आहे. त्याच्या हा हार्डवर्कने त्याच्या घराचे स्वप्न साकार केले. नवाजुद्दीनला त्याचा हा आलिशान बंगला तयार करण्यासाठी तीन वर्ष लागली. संपूर्ण घराला व्हाइट कलर देण्यात आला आहे. बंगल्याबाहेर अनेक झाडे लावण्यात आली आहेत. बंगल्याबाहेर बसण्यासाठी मोकळी जागा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बंगल्याच्या एंट्रीला लाकडी ट्रेडिशनल डिझाइनचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. बालकनीमध्ये हॅगिंग लाइट्स बसवण्यात आल्यात ज्याने बंगल्याला विंटेज लूक आला आहे.

नवाजुद्दीनने त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा बंगला तयार केल्याचे म्हटले जात आहे. नवाजुद्दीच्या गावाकडच्या घरासारखा हा बंगला आहे. नव्या घराचे नाव त्याने ‘नवाब’ असे ठेवले आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरांची नावे फार आकर्षक आहेत. ज्यात शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे नाव आहे. आता या लिस्टमध्ये नवाजुद्दीनच्या नवाब बंगल्याच्या नावाचा देखील समावेश झाला आहे.

नवाजुद्दीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर नवाजुद्दीन सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री कंगनाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ या सिनेमातही नवाजुद्दीन निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – Shweta Tiwari Controversy: ‘ब्रा आणि भगवान’ कमेंटमुळे श्वेता तिवारी विरोधात FIR दाखल, श्वेता म्हणते…