घरमनोरंजनद कश्मीर फाईल्सवर बॉलिवूडमध्ये फूट पडलीय का? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो "मी..."

द कश्मीर फाईल्सवर बॉलिवूडमध्ये फूट पडलीय का? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो “मी…”

Subscribe

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र असं असलं तरी सध्यस्थितीत भारतात एक वर्ग असाही आहे, जो या चित्रपटाला सातत्यानं विरोध करत आहे. या चित्रपटावरुन जोरदार राजकारण सुरु असून, अनेक राजकीय नेते या चित्रपटाबाबत भाष्य करत आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीने ही आपलं मत व्यक्त आहे.

अभिनेता नवाझुद्दिन याने ‘एबीपी आयडियाज ऑफ इंडियाच्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमात बोलताना त्याने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबतच आपलं मत व्यक्त केलं. ”मी हा चित्रपट अद्याप पाहिला नाही, मात्र पाहणार हे नक्की.” असं नवाझुद्दिनने म्हटलं.

- Advertisement -

त्यानंतर या चित्रपटावरून बॉलीवूडमध्ये फूट पडली आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला यावर उत्तर देताना नवाझुद्दिन म्हणाला, ”मला हे माहीत नाही, पण प्रत्येक दिग्दर्शकाचा प्रत्येक चित्रपट बनवण्याचा आपला दृष्टिकोन असतो. त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवला, यापुढेही दिग्दर्शक त्यांच्या दृष्टिकोनातून चित्रपट बनवणार आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही, मात्र चित्रपटांमध्ये काही गोष्टी जोडल्या देखील जातात. पण दिग्दर्शक जेव्हा असे चित्रपट बनवतील, तेव्हा साहजिकच त्या संदर्भातील खऱ्या गोष्टी तपासूनच बनवतील.”

सध्या राजकारण्यांकडून ही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची स्तुती केली जात आहे. याबाबतही नवाझुद्दिन सिद्दिकीने भाष्य केलं. यावेळी त्याने ”त्यांना हा चित्रपट आवडला असेल, म्हणून ते त्याचे कौतुक करत असावे”, असं म्हटलं. तसंच, ”मी अभिनेता झालो नसतो तर साधू झालो असतो. मी दोन ते तीन वेळा धर्मशाळेत जाऊन साधू बनण्याचा प्रयत्न देखील केला.”, असंही त्यानं पुढे म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा – RRR वर krk ची संतप्त प्रतिक्रिया, म्हणतो S Rajamouli ला जेलमध्ये टाका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -