घरमनोरंजननवाझुद्दीन सिद्दिकीच्या 'या' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

नवाझुद्दीन सिद्दिकीच्या ‘या’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

Subscribe

नवाझुद्दीन सिद्दिकीने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूडमधील अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी याने वेगवेगळ्या भूमिका साकार करुन चाहत्याच्या मनात स्थान मिळवले आहे. वेबसीरीजमध्ये देखील त्याने आपली भूमिका चोखपणे साकारली आहे. तो सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असतो. नुकतंच त्याने त्याच्या नव्या चित्रपटाबाबत सांगितले आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने नव्या चित्रपटाबद्दल सांगितले आहे. ‘जोगीरा सारा रारा’ ह्या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दिकी काम करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतंच सुरु झाल्याची माहिती नवाजने आपल्या पोस्टमधून दिली आहे. हा चित्रपट रोमँटिक आणि कॉमेडीसुद्धा आहे. या चित्रपटाचे लेखन गालिब असद भोपाली यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती निर्माता कुशल नंदी यांनी केली आहे. या चित्रपटात नवाझुद्दीन सोबत अभिनेत्री नेहा शर्मा देखील असणार आहे.

- Advertisement -

‘जोगीरा सारा रा रा’ या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमधील बाराबंकी टाऊनमध्ये सुरु आहे. तसेच, रहिमबाद आणि बनारसमध्येही या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दिकी आणि नेहा शर्मा या जोडीसोबतच संजय मिश्रा आणि मिमोह चक्रवर्ती ही जोडीसुद्धा दिसणार आहे.

नवाझुद्दिन सिद्दिकीने अमीर खानच्या सफरोश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरीजमधील गणेश गायतोंडे या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली. त्याचबरोबर, ‘ठाकरे’ चित्रपटात त्याने साकारलेली बाळासाहेब ठाकरेंची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. कुशन नंदी हे या चित्रपटाचे निर्माते असून नवाझुद्दीन सोबत हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी २०१७ साली ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ या अॅक्शन चित्रपटात काम केलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – Amitabh Bachchan Health: बिग बींची प्रकृती बिघडली, चाहत्यांना मोठा धक्का

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -