घरमनोरंजननवाजुद्दीन सिद्दीकीचा स्त्री वेशातील नवा लूक, अर्चना पूरणसिंहसोबत तुलना

नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्त्री वेशातील नवा लूक, अर्चना पूरणसिंहसोबत तुलना

Subscribe

नवाजद्दीनच्या आगामी 'हड्डी' चित्रपटाची आज पहिली झलक शेअर करण्यात आली. यामध्ये नवाजुद्दीन मॉडर्न लेडीच्या वेशभूषेत दिसून येत आहे. नवाजुद्दीनचा हा लूक बोल्ड आणि स्टाइलिश दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्यांच्या चित्रपटांतील विविध आणि उत्तम अभिनयामुळे ओळखला जातो. आपल्या चित्रपटातील दमदार अभिनयाने तो नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतो. दरम्यान, नुकतेच त्याच्या आगामी चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी स्त्री वेशात दिसून येत आहे. मात्र त्याच्या हा लूक पाहून सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.

नवाजुद्दीनचा लूकची सोशल मीडियावर चर्चा
नवाजद्दीनच्या आगामी ‘हड्डी’ चित्रपटाची आज पहिली झलक शेअर करण्यात आली. यामध्ये नवाजुद्दीन मॉडर्न लेडीच्या वेशभूषेत दिसून येत आहे. नवाजुद्दीनचा हा लूक बोल्ड आणि स्टाइलिश दिसून येत आहे. दरम्यान, नवाजुद्दीनचा हा लूक पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले असून चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक देखील झाले आहेत. इतकंच नव्हे तर, नवाजुद्दीनच्या या लूकचू अनेकजण अभिनेत्री अर्चना पूरन सिंहसोबत देखील तुलना करू लागले आहेत. अनेकांच्या मते, नवाजुद्दीन स्त्री वेशभूषेत हूबेहूब अर्चना पूरन सिंह सारखे दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या या प्रकारचे अनेक मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

- Advertisement -

अर्चना पूरन सिंहने दिली प्रतिक्रिया
नवाजुद्दीनच्या या लूकवर अर्चना पूरन सिंहने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, हेअरस्टाइल माझ्या सारखी दिसत आहे. त्यामुळेच अनेकजण तुलना करत आहेत. कपिल शर्मा शोच्या सुरूवातीला मी अशाप्रकारचीच हेअरस्टइल करायचे. आता मी फक्त एकच सांगेन की, माझी नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत कोणत्यातरी गोष्टीवरुन तुलना केली जात आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

या दिवशी प्रदर्शित होणार नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ चित्रपट
नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हड्डी’ चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसून येईल.


हेही वाचा : विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘शिवप्रताप – गरुडझेप’ झळकणार रूपेरी पडद्यावर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -