नयनतारा आणि विग्नेश शिवन अखेर विवाहबंधनात

नयनताराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये विग्नेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली असून नयनताराने लाल रंगाची साडी नेसलेली आहे. नयनतारा या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे

कॉलीवूडची सुपरहिट जोडी नयनतारा आणि विग्नेश शिवन यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नयनतारा आणि विग्नेश शिवनच्या लग्नाची चर्चा चालू होती. 6 वर्षाच्या लॉंग रिलेशननंतर दोघेही आता पती-पत्नी झालेले आहेत. नुकताच नयनताराने आपल्या लग्नाचा पहिला फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहताच चाहत्यांनी नयनतारा आणि विग्नेशला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

नयनताराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये विग्नेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली असून नयनताराने लाल रंगाची साडी नेसलेली आहे. नयनतारा या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तसेच तिने या फोटो खाली एक छान कॅप्शनसुद्धा दिलेले आहे, त्यात तिने लिहिलंय की, “देवाच्या कृपेने ब्रह्मांड, आमचे आई-वडील , चांगले मित्र आणि सगळ्यांच्या आर्शिवादाने आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरूवात करत आहोत”. याशिवाय या फोटोमध्ये नयनतारा आणि विग्नेशने एकमेकांचा हात हातामध्ये घेतला असून विग्नेश नयनताराच्या कपाळाचे चुंबन घेत असल्याचे दिसत आहे.

6 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये होते नयनतार आणि विग्नेश
चित्रपटसृष्टीशी जोडलेले असल्याने या दोघांची लव स्टोरी फार चर्चेत असते. या दोघांची पहिली भेट एका सेट वर झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेशने केले होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. मैत्री झाली आणि त्याचंच रूपांतर प्रेमात झाले. 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर नयनतारा आणि विग्नेशने 25 मार्च 2021 रोजी साखरपुडा केला.

लग्नात टॉलिवूडसह बॉलिवूड कलाकारसुद्धा लावणार हजेरी

 

View this post on Instagram

 

A post shared by Vignesh Shivan (@wikkiofficial)

नयनतारा आणि विग्नेशचा विवाहसोहळा चेन्नई येथील महाबलिपुरममधील एका रिसॉर्टमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. 10 जून रोजी रिसेप्शन पार पडणार आहे. या स्टार कपलच्या विवाह सोहळ्यात टॉलिवूडसह बॉलिवूड कलाकार ही सहभागी होणार आहेत. नयनताराच्या लग्नात शाहरूख शिवाय रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, कार्ति, विजय सेतुपति आणि सामंथा रुथ प्रभु यांसारखे अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे.

नयनतारा पुढील काही दिवसात शाहरूख सोबत ‘जवान’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच येत्या 17 जून रोजी OTT वर नयनताराचा ‘O2’ रिलीज होणार आहे. तसेच लग्नानंतर दोघेही आपल्या ‘एके 62’ मध्ये काम करतील विग्नेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

 


हेही वाचा : नयनताराच्या लग्नात टॉलिवूडसह बॉलिवूड कलाकारसुद्धा लावणार हजेरी