समीर यांनी कामासाठी वैयक्तिक आयुष्य लावले पणाला, पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरचा खुलासा

ते आपल्या कामाशी खुप प्रामाणिक असून कामासाठी त्यांनी आपले वयक्तिक आयुष्य सॅक्रिफाइज केले आहे

NCB officer sameer wankhede's wife actress kranti redkar reaction on Cruise Drugs case
समीर यांनी कामासाठी वैयक्तिक आयुष्य लावले पणाला, पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरचा खुलासा

एनसीबी (NCB) मुंबईचे झोनल ऑफिसर समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे चांगलेच चर्चेत आहेत. अनेक स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहेत. ड्रग्ज प्रकरणी त्यांनी मागच्या अनेक महिन्यात मोठ्या कारवाई केल्या आहेत. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझवर छापेमारी केल्यानंतर समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या कामगिरीनंतर त्यांची पत्नी तसेच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने समीर यांचे कौतुक करत त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘समीर वानखेडे कामात असल्यावर केवळ २ तास झोप घेतात. कामासाठी त्यांनी आपले वैयक्तीत आयुष्य सॅक्रिफाइज केले आहे’ ,असे क्रांतीने सांगितले. ई टाईम्सने घेतलेल्या एका मुलाखतीत क्रांतीने हा खुलासा केलाय.

 

‘समीर जेव्हा एखादे प्रकरण हाताळतात तेव्हा मी त्यांना त्यांचा संपूर्ण देते. तेव्हा मी त्यांना कोणतेही प्रश्न विचारत नाही. ते आपल्या कामाकडे आणि मी घराकडे लक्ष देते. समीर कधी कधी त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात की केवळ २ तासांची झोप घेतात आणि पुन्हा कामाला लागतात. ते आपल्या कामाशी खुप प्रामाणिक असून कामासाठी त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य सॅक्रिफाइज केले आहे’, असे क्रांतीने म्हटले आहे.

ई टाईम्सने घेतलेल्या एका मुलाखतीत क्रांतीने पती समीर वानखेडे यांचे कौतुक करत ‘मला एक पत्नी म्हणून त्यांचा अभिमान वाटतो. ते फार मेहनती आहेत. याआधी त्यांनी अशी प्रकरणे हाताळली आहेत. मात्र हे प्रकरण बॉलिवूडशी संबंधीत असल्याने त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे.’

क्रांतीने पुढे असे म्हटले आहे की, ‘समीर जेव्हा कोणत्याही सिक्रेट ऑपरेशनसाठी निघतात तेव्हा ते कधीच त्यासंबंधीची माहिती आपल्या कुटुंबाला सांगत नाही. मी देखील त्यांना कधीच त्याचे फोन कॉल्स सुरू असताना प्रश्न विचारत नाही. मी त्यांच्या कामाची कधीच तक्रार केलेली नाही. त्याच्या कामाचा मला सार्थ अभिमान आहे’,असे क्रांतीने म्हटले आहे.


हेही वाचा – Aryan Khan Drug Case: संजूबाबा ते भाईजानला जामीन मिळवून देणारे वकील सतीश मानेशिंदे आहेत तरी कोण?