Aryan Khan Bail Hearing: आर्यनच्या अडचणीत वाढ, NCBने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची केली मागणी

Aryan Khan Drug Case krk reveals many star kids has planning to leave india after see shah rukh khan son drugs case
Aryan Khan Drug Case: आर्यन खानची केस पाहून बॉलिवूड स्टारकिड्सचा भारत सोडण्याचा निर्णय!

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी काही कमी होण्याचे नवा घेत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात एनसीबीने आर्यन खानसह १६ जणांना अटक केली आहे. यामध्ये आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा सामील आहे. या सर्वांना मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया द इम्प्रेस नावाच्या कूझवर एनसीबी अटक केले. काही दिवसांपूर्वी आर्यनसह आठ जणांना कोर्टाने ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत रवानगी केली होती. कोठडीचा कालावधी संपल्यामुळे आज सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले आहे. पण आजही आर्यनच्या अडचणी कमी होण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत. कारण पुन्हा एकदा एनसीबीने कोर्टाकडे आर्यनसह इतर आरोपींची ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे.

आज कोर्टात एनसीबीने सांगितले की, अजूनही छापेमारी सुरू आहे. त्यामुळे छापेमारीमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीला सध्या आरोपींसोबत चौकशी करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनला भेटण्यासाठी दोन मिनिटांची परवानगी मागितली होती. कोर्टाने परवानगी दिल्यानंतर मानेशिंदेसोबत शाहरुखची मॅनेजर आर्यनला भेटल्याची माहिती मिळत आहे. सध्या आर्यनच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आर्यनला जेल मिळणार की बेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – Cruise drug bust: ह्रतिक रोशनची आर्यनसाठी पोस्ट, म्हणाला …