Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Sushant Suicide Case: बॉलिवूडकरांना ड्रग्ज पुरवणाऱ्याला NCB ने घेतलं ताब्यात!

Sushant Suicide Case: बॉलिवूडकरांना ड्रग्ज पुरवणाऱ्याला NCB ने घेतलं ताब्यात!

Subscribe

अमली पदार्थ प्रकरणी NCB ने पहिली कारवाई केली आहे. NCB ने मुंबईत दोन ठिकाणी छापा टाकून एक अंमली पदार्थ सप्लायरला ताब्यात घेतलं आहे. परवेज खान उर्फ चिंकू पठाण असं या अमली पदार्थ सप्लायरचं नाव आहे. दक्षिण मुंबईसह बॉलिवूड जगतात हा AK 47 या नावाने कुप्रसिद्ध आहे.

परदेशातून येणारा गांजा ज्याला Doodies असे देखील बोलले जाते. फिल्म जगतातील अनेक कलाकारं गांजाचे शौकिन आहेत. हा गांजा चिंकू पठाण सप्लाय करायचा असा संशय NCB होता. तसंच एक मुलगी देखील या अंमली पदार्थ सप्लाय चैनमध्ये असल्याची माहिती NCB ला मिळाली आहे. सध्या या मुलीचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

चिंकु पठाण हा बॉलिवूड आणि उद्योग जगतातील मोठ्या लोकांच्या घरात काम करणारे तसंच सोबत असणाऱ्यांच्या संपर्कात असतो आणि चिंकू कोड नेम वापरत त्यांना अमली पदार्थ सप्लाय करतो. NCB ला संशय आहे की याच चिंकू पठाणाने रिया चक्रवर्तीला देखील अंमली पदार्थ सप्लाय केले आहेत आणि सुशांतच्या घरात काम करणारा एक व्यक्ती चिंकूच्या संपर्कात होता असा देखील संशय NCB ला आहे.

चिंकू हा गौरव आर्याच्या संपर्कात असायचा. कारण गौरव आर्या हा मोठा हॉटेल व्यावसायिक असून हॉटेल व्यावसायाच्या पार्श्वभूमीवर गौरव आर्या अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवायचा असा संशय NCB ला आहे. गौरव आर्याचे बॉलिवूड आणि उद्योग क्षेत्रात मोठे कनेक्शन असून अनेकांचा त्याच्यावर विश्वास असल्याने त्याच्या मार्फत अंमली पदार्थांची मागणी केली जायची. चिंकू पठाणला NCB ने ताब्यात घेतल्याने गौरव आर्या आणि रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर बॉलिवूड आणि उद्योग जगतातील अनेकजण NCB च्या रडारवर आले आहेत.


- Advertisement -

हे ही वाचा – Sushant Sucide Case: हत्येचा अद्याप पुरावाच मिळाला नाही – CBI


- Advertisment -