‘जुग जुग जिओ’च्या प्रमोशनदरम्यान नीतू कपूर आणि अनिल कपूरने केला ऋषि कपूरच्या ‘या’ गाण्यावर डान्स

वरूण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर सध्या त्यांच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक शहरांमध्ये जात आहेत. या प्रमोशन दरम्यान चित्रपटातील कलाकारांची केमिस्ट्री पाहून चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अधिकच उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिल्ली येथे नुकतेच प्रमोशन पार पडले. या प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर या दोघांनी ऋषि कपूर यांच्या एका गाण्यावर डान्स केला आहे.

‘जुग जुग जिओ’ चित्रपटाचे दिल्ली येथे नुकतेच प्रमोशन पार पडले, या आयोजित फॅन इवेंटमध्ये नीतू कपूर, वरूण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, मनीष पॉल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले आहेत. या इवेंटमध्ये १९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘खेल खेल में’ चित्रपटातील ‘एक में और एक तू’ हे गाणं लावण्यात आलं. हे गाणं एकूण नीतू कपूर आणि अनिल कपूर यांनी सुंदर डान्स करू लागले.

‘राम लखन’च्या गाण्यावरही केला डान्स
व्हिडीओमध्ये नीतू कपूर आणि अनिल कपूरच्या गाण्यानंतर या चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट स्टेजवर येते आणि सगळे मिळून अनिल कपूरच्या ‘राम लखन’ चित्रपटातील गाणं ‘माय नेम इज लखन’वर डान्स करतात.

‘जुग जुग जिओ’ चित्रपट एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असून या चित्रपटाला राज मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला धर्मा प्रोडक्शनने प्रोड्यूस केले आहे. येत्या २४ जून रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.