चित्रपटांमध्ये कमबॅक करत नीतू कपूर ओटीटी वरही झळकणार

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर( ridhi kapoor) आणि त्यांची पत्नी नीतू कपूर(neetu kapoor) बॉलिवूड मधल्या या जोडीने प्रेक्षकांना भरभरून आनंद दिला आहे. जुग जुग जिओ या चित्रपटात नीतू कपूर पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर( ridhi kapoor) आणि त्यांची पत्नी नीतू कपूर(neetu kapoor) बॉलिवूड मधल्या या जोडीने प्रेक्षकांना भरभरून आनंद दिला आहे. या जोडीची अनेक गाणी आणि चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत. आजही प्रेक्षकांना त्यांची गाणी तितकाच आनंद देतात. जेष्ठ अभिनेते आणि पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर स्वतःला सावरत नीतू यांनी स्वतःला पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात गुंतवरून घेतेले. नीतू कपूर सध्या रिऍलिटी शो आणि चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रणबीर – आलीया यांचं लग्न, ब्रम्हास्त्र चित्रपटाची घोषणा त्याचबरोबर शमशेरा या आगामी चित्रपटाची घोषणा आणि त्याचबरोबर सासूच्या भूमिकेत नीतू यांचे आलिया सोबत जुळलेले नाते या सगळ्या संदर्भातच नीतू यांना माध्यमांकडून नेहमीच प्रश्न विचारले जायचे. या सगळ्यालाच कायम आनंदाने सामोऱ्या जाणाऱ्या नीतू कपूर यांनी त्यांच्या अनेक दिवसांनंतर आलेल्या जाग जाग जिओ या चित्रपटाच्या निमित्ताने अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

नीतू कपूर यांच्या अभिनयाचे चाहते आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या नीतू कपूर रिऍलिटी शो आणि त्यांच्या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून पुहा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. एवढ्या वर्षात त्यांच्या अभिनयात पडलेले अंतर नीतू यांनी वेगाने पुसून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण म्हणजे नीतू कपूर यांचा जुग जुग जिओ(jug jug jiyo) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने नीतू मोकळेपणाने गप्पा मारत होत्या आणि लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा पदार्पण करणार असल्याचंही नीतू कपूर यांनी सांगितले. सध्या मीडियाची व्याप्ती ही खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे कलाकारांनाही विविध माध्यमांची दारं खुली झाली आहे. त्यामुळे प्रत्येकच कलाकाराला स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक पर्याय मिळाले आहेत. त्याचबरोबर जुग जुग जिओ या चित्रपटात नीतू कपूर यांची आईची भूमिका ही खूप सुंदर पद्धतीने लिहिली गेली आहे. त्यामुळे ती अधिक उठावदार झाली आणि त्याच संपूर्ण श्रेय नीतू कपूर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता(raj mehata) यांना दिले. नीतू कपूर यांची चित्रपट सृष्टीमधील कारकीर्द ही बालकलाकार म्हणून झाली आणि पुढे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्ह्णून नीतू यांनी स्वतःची एक वगेळी ओळख निर्माण केली. त्यानंतर सुपरस्टार ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि रणबीर – रिधिमा यांची आई या भूमिका साकारत असताना त्यांनी चित्रपटांमधून एक बराच मोठा काळ विश्रांती घेतली आणि पूर्ण वेळ स्वतःच्या घरासाठी, कुटुंबासाठी दिला. पण आजही नीतू यांचा उत्साह कायम आहे.

हे ही वाचा – धमाल मस्तीने सजलेला ‘जुग जुग जियो’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाhttps://www.mymahanagar.com/entertainment/the-hilarious-movie-jug-jug-jio-will-be-released-soon/435302/

रणबीर आणि आलिया (ranbir – alia) यांच्या लग्नाबद्दल बोलताना नीतू कपूर म्हणाल्या, की सप्टेंबर मध्ये मी रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाचा मुहूर्त शोधत होते. पण पुन्हा कोव्हीड वाढू लागला आणि पुन्हा लोकडाऊन झालं तर लग्न होऊ शकणार नाही. त्यामुळे विलंब नको यावर रणबीर आणि आलिया ठाम होते. मग मी सुद्धा तयार झाले. आणि लग्नाचा लवकरच मुहूर्त काढून लग्न पार पडले. पण या सगळ्यात तयारी करण्यासाठी माझ्या हातात खूप कमी दिवस उरले होते. त्या मुले माझी खूप घाई झाली असंही नीतू म्हणाल्या.

त्याच बरोबर आलिया आणि त्यांच्या मध्ये जे नातं आहे त्यावरही नीतू म्हणाल्या की मी जेव्हा लग्न करून कपूर यांच्या घरात आले तेव्हा माझ्या सासूबाई माझ्यासाठी सगळ्यात मोठा आधार होत्या, त्या नेहमीच मला सांभाळून घेत असतं. कधी काही भांडण झालं तर तर त्या नेहमीच माझी बाजू घेत असतं. माझ्या सासुबाईंचं आणि माझं खूप छान नातं होतं तसेच छान नातं माझं आणि माझ्या सुनेचं म्हणजे आलियाचं आहे. आलिया अत्यंत गुणी मुलगी आहे. आणि रणबीर सुद्धा नात्यांमध्ये समतोल राखणारा मुलगा आहे. आलिया आणि माझ्या नात्यामध्ये कधीच दुरावा येऊ शकत नाही असंही नीतू कपूर यांनी सांगितले.

हे ही वाचा- रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’मध्ये झळकणार ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘हा’ अभिनेताhttps://www.mymahanagar.com/entertainment/actor-in-ranbir-kapoors-shamsheera-series-what-exactly-is-happiness/450251/

या सगळ्या संदर्भातच बोलताना नीतू कपूर यांनी बॉलिवूड मधल्या त्यांचा कलासंदर्भातील काही गोष्टी सुद्धा सांगितल्या त्यावेळी त्या म्हणाल्या, आमच्या काळात ग्लॅमर असलं तरीही हिरॉईन म्हणून नायिकेने एका विशीष्ट प्रकारची शरीरयष्टी ठेवावी असा काहीच आग्रह नव्हता. मी, रेखा(rekha), रीना रॉय आमची शरीरयष्टी चारचौघींप्रमाणेच होती. पण झीनत अमान चित्रपट सृष्टीमध्ये आल्यानंतर तो बदल झाला. पुढे त्या दृष्टीने नायिकांसाठी बारीक असणं आणि दिसणं महत्वाचं ठरू लागलं.

यातच आणखी एक महत्वचाही बाब म्हणजे नीतू कपूर म्हणाल्या, की मला आत्मचरित्र लिहिण्यासाठी अनेकांनी आग्रह केला होता. पण त्या साठी मला खूप वेळ द्यावा लागेल. माझं लहानपणापासून सुरु झालेलं चित्रपट करियर, ऋषी कपूर यांच्याशी विवाह, कुटुंब, ऋषी कपूर (rishi kapoor) यांचं आजारपण आणि अश्या बऱ्याच गोष्टी लिहिण्यासाठी आहेत. पण ते उतरविण्यासाठी कधी आणि कसा वेळ मिळेल या संदर्भात नीतू कपूर थोड्या साशंक असल्याचं सांगतात.