Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन नीतू कपूरने दिली आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दल माहिती

नीतू कपूरने दिली आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दल माहिती

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 6 नोव्हेंबर रोजी आई-बाबा झाले. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या आनंदाच्या बातमीने कपूर कुटुंबामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. नीतू कपूर देखील आजी झाल्यामुळे खूप खूश आहेत. दरम्यान, नीतू कपूरचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नीतू कपूर आपल्या नातीबद्दल आणि आलियाबद्दल माहिती देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नीतू कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जेव्हा फोटोग्राफर नवीन जन्मलेल्या बाळाबद्दल नीतू कपूर यांना विचारतो की बाळ आलियावर गेलं आहे की, रणबीरवर तेव्हा नीतू कपूर म्हणतात, “अजून ती खूप लहान आहे. पण ती खूप क्यूट आहे. मी खूप खूश आहे. सोबतच आलियाच्या प्रकृतीबाबत सांगताना त्या म्हणतात की, आलिया सुद्धा ठीक आहे.”

- Advertisement -

बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
आलियाने शेअर केलेल्या या पोस्टखाली बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, कियारा अडवाणी, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, सोनम कपूर, दीपिका पादुकोण, कतरिना कैफ यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, रविवारी सकाळी 7:30 च्या सुमारास आलिया डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. काल(रविवारी) दुपारी आलियाने मुलीला जन्म दिला.

- Advertisement -

जून महिन्यात दिली होती गोड बातमी
यंदा एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली. आलिया आई होणार असल्याची बातमी तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या सोबत रणबीर देखील होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी आलियाला ट्रोल देखील केलं होतं.

 


हेही वाचा :

अक्षयसोबतच ‘या’ कलाकारांनीही दिल्या आलिया-रणबीरला शुभेच्छा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -