‘आमच्या कथेचा अंत झाला’, भावूक झाल्या नीतू सिंग!

हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या निधनानंतर बॉलिवूड अद्याप सावरलंही नाही तोच बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली आणि बॉलिवूडला यातून सावरणे कठीण झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा परसरली आहे. २४ तासात बॉलिवूडने दोन जबरदस्त अभिनेते गमावले आहेत.  अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७ वर्ष जगाचा निरोप घेतला. ३० एप्रिलला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती समजताच संपूर्ण कलाविश्वावर एकच शोककळा पसरली. यामध्येच नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केला आहेत. त्यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत ‘आमच्या कथेचा अंत झाला’, असं म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट वाचल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्क केली आहे.

View this post on Instagram

End of our story ❤️❤️

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्यातलं प्रेम साऱ्यांनाच ठाऊक होतं. एकमेकांच्या प्रेमात पडल्यापासून ते आतापर्यंत या दोघांनी कायम एकमेकांची साथ दिली. त्यामुळेच सध्या नीतू यांनी ऋषी कपूर यांची सल भासत आहे. ऋषी कपूर यांनी अचानकपणे घेतलेल्या एक्झिटमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यातच कपूर कुटुंबाने त्यांच्या घरातील एक हरहुन्नरी व्यक्ती गमावलं आहे. त्यामुळे त्यांची उणीव घरातील प्रत्येक सदस्याला कायम जाणवेल. यामध्येच नीतू कपूर सध्या प्रचंड भावनिक झाल्या असून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत ऋषी यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर ऋषी यांचा फोटो शेअर करुन ‘आमच्या कथेचा शेवट झाला’, असं म्हटलं आहे.


हे ही वाचा – ‘तुम्ही नेहमीच आमच्या मनात जिवंत रहाल’ सुबोध भावेने व्यक्त केल्या भावना!