नीतू कपूर यांनी सांगितला सागर चित्रपटातील ऋषि कपूर यांचा ‘तो’ किस्सा

'सागर' चित्रपटात डिंपल कपाडियासोबत किसिंग सीन करताना चिंटूजी खूप घाबरले होते.

दिवंगत अभिनेते ऋषि कपूर हे त्यांच्या काळातील एक अत्यंत लोकप्रिय आणि दर्जेदार अभिनेते होते. ते त्यांची प्रत्येक भूमिका उत्तमपणे साकारत असत. त्याचबरोबर ऋषि कपूर यांची पत्नी अभिनेत्री नीतू कपूर देखील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. मात्र, ऋषि कपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर नीतू कपूर यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. पण, ऋषि कपूर चित्रपटात काम करत होते. अभिनय विश्वात नायक-नायिका अनेकदा चित्रपट आणि कथेच्या मागणीनुसार बोल्ड आणि किसिंग सीन देतात. तशी कथेची गरज असते. ऋषी कपूरच्या बाबतीतही असेच झाले. विशेष म्हणजे ऋषि कपूर त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक किसिंग सीनवर नीतू कपूर यांच्यासोबत चर्चा करायचे.

ऋषि कपूर आणि नितु कपूर यांचे सर्वच चित्रपट हिट झाले. ऋषि कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात नीतू कपूरने सांगितले होते की, त्यांना ऋषि कपूर यांच्या सोबत असलेल्या को-स्टारचा कधीच हेवा वाटला नाही. ‘सागर’ चित्रपटात डिंपल कपाडिया यांच्यासोबत ऋषि कपूर यांचा किसिंग सिन होता हा असून झाल्यानंतर ऋषि कपूर खूप तणावात असल्याचेही नीतू कपूरने नमूद केले. पण, नीतू कपूर यांची प्रतिक्रिया अशी होती की ज्याची खुद्द ऋषि कपूर यांनाही अपेक्षा नव्हती. ऋषि कपूर यांच्या पुस्तकात लिहिताना नीतू कपूर यांनी सांगितले होते की,

rishi kapoor

‘सागर’ चित्रपटात डिंपल कपाडियासोबत किसिंग सीन करताना चिंटूजी खूप घाबरले होते. ऋषि कपूर यांना त्यांच्या कुटुंबातील माणसे प्रेमाने चिंटू जी म्हणायची. खरं तर, सागर चित्रपटातील हा किसिंग सिन पाहिल्यानंतर ते नीतू यांना आवडणार नाही अशी भीती ऋषि कपूर यांना वाटत होती. दरम्यान या सगळ्या नंतर ”आपण इतके वाईट चुंबन कसे असू शकता? मला वाटते की तुम्ही यापेक्षा आणखी चांगल्या प्रकाराने सिन करू शकला असता.’ नीतू कपूर यांचे हे उत्तर ऐकून ऋषी कपूर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

डिंपल कपाडियासोबत बोल्ड सीन दिल्यानंतर ऋषि कपूर यांना वाटले की नीतू कपूर रागावतील. पण असे झाले नाही. याशिवाय नीतू कपूरने असेही लिहिले आहे की, ‘ऋषि कपूर जर कोणत्याही सहकलाकाराला आवश्यकतेपेक्षा जास्त पसंत करायचे तर ते त्यांना सांगायचे. ते रोज संध्याकाळी व्हिस्की प्यायचे आणि आपल्या मनातील सर्व गुपितं सांगायचे. नीतू कपूर यांनी लिहिले की, ऋषि यांना हे समजायचे नाही की ते सर्व रहस्य आपल्या पत्नीला सांगत आहे, बॉलिवूडच्या या देखण्या अभिनेत्याने 20 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला.