Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Neha Dhupia Announce Second Pregnancy: नेहा धुपियाच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा

Neha Dhupia Announce Second Pregnancy: नेहा धुपियाच्या घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार (Neha Dhupia Announce Second Pregnancy) आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत नेहाने ही गुडन्यूज चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इन्स्टाग्रामवर नेहाने पती अभिनेता अंगद बेदी (angad bedi) आणि मुलगी मेहरसोबत (mehr dhupia bedi) कौटुंबिक फोटो शेअर करत दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची बातमी दिली आहे. ही गुडन्यूज देण्यासाठी तिला दोन दिवस लागले, असे तिने फोटो शेअर करताना सांगितले आहे.

नेहाने फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘आम्हाला कॅप्शन शोधण्यासाठी दोन दिवस लागले. ज्या बेस्ट गोष्टीबाबत आम्ही विचार करू शकतो, ती ही आहे. धन्यवाद देवा..’

- Advertisement -

नेहाच्या दुसऱ्यांदा आई बनण्याच्या बातमीमुळे सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सानिया मिर्झा, भावना पांडे, फराह खान, रोहित शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींनी नेहा आणि अंगदला शुभेच्छा दिल्या आहेत. फराह खानने स्माईलिंग इमोजीसोबत लिहिले आहे की, ‘तर आता मी लोकांना सांगू शकते ना?’

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

फोटोमध्ये नेहा ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर अंगद बेदी एका हातात मुलगी मेहरला पकडून दुसऱ्या हाताने नेहाच्या बेबी बंपवर हात फिरवताना दिसत आहे. मेहर सुद्धा आपल्या आईच्या बेबी बंपला पाहत आहे. तिघांनी आउटफिट एकाच रंगाचे घातले आहेत.

- Advertisement -

नेहाची पहिली प्रेग्नेंसी खूप चर्चेत आली होती. मे २०१८मध्ये अंगद आणि नेहाचे लग्न झाले. याबाबत कोणालाही माहित नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा नेहाने गर्भवती असल्याचे जाहीर केले, तेव्हा लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर नेहाने नोव्हेंबर २०१८ पहिल्या मुलीला जन्म दिला.

- Advertisement -