प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. जो तिच्याविषयी जाणून घेण्यास कायम उत्सुक असतो. आपल्या कारकिर्दीसोबत वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असणाऱ्या नेहा धुपियाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नेहा धुपिया ही रोडीजमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत दिसते आणि याच शोच्या शूटिंग दरम्यान तिची तब्येत बिघडल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री नेहा धुपियाची शूटिंगदरम्यान तब्येत बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. (Neha Dhupia health deteriorated on the shooting set of Roadies)
सेटवरच बिघडली तब्येत
‘एमटीवी रोडीज XX’ची गॅंग लीडर नेहा धूपिया शोच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, शूटिंग सुरु असताना नेहाची तब्येत बिघडली आणि ती बेशुद्ध पडल्याचे समजत आहे. मात्र, थोड्यावेळाने ती शुद्धीत आली. त्यानंतर आपण ठीक असल्याचे सांगत तिने शोचे शूटिंग पुन्हा सुरू केले. शोच्या शूटिंगमध्ये कोणतेही व्यत्यय येऊ नये म्हणून शुद्धीत आल्यानंतर काही वेळातच तिने पुन्हा कामाला सुरुवात केली.
छोटासा हेल्थ इश्यू
नेहा धूपियाची अचानक तब्येत बिघडल्याचे समोर आल्यापासून चाहते प्रचंड चिंतेत आहेत. यानंतर नेहा धूपियाने हेल्थ अपडेट दिली आहे. अभिनेत्रीने म्हटले, ‘छोटासा हेल्थ इश्यू होता. अजिबात काळजी करण्याचे कारण नाही’. सेटवर बेशुद्ध झाल्यानंतर अभिनेत्रीने छोटा ब्रेक घेतला आणि त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. माहितीनुसार, नेहा धुपियाचे शेड्यूल सध्या प्रचंड बिझी सुरू आहे. ती रोडीजच्या ऑडिशनसाठी विविध शहरांमध्ये फिरतेय आणि यामुळे तिला मुलांपासून लांब रहावे लागत आहे.
मला थांबवणारं कुणीच नाही
शोच्या नव्या प्रोमोमध्ये नेहा धूपिया बेशुद्ध पडल्याची घटना दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत वेगवेगळे तर्क लावले गेले. याविषयी बोलताना अभिनेत्री नेहा धुपियाने सांगितले, ‘मला काहीही झालेले नाही. छोटासा हेल्थ इश्यू होता. ज्यामुळे मी बेशुद्ध पडले. पण आता मी पुन्हा माझ्या पायावर व्यवस्थित उभी आहे आणि नव्या कामासाठी उत्सुक आहे. रोडीज कायम लिमिटलेस राहिला आहे आणि त्यामुळे हा प्रवास करताना मला कोणतीच बाधा अडवू शकत नाही. अर्थात मला थांबवणारा कुणीही नाही’.
मेकर्सकडून अभिनेत्रीचे कौतुक
शोच्या मेकर्सने नेहाविषयी बोलताना म्हटले, ‘नेहाचं कामाबाबत असणारं डेडिकेशन खरोखरचं कौतुकास्पद आहे. आपल्या व्यस्त शेड्युल आणि तब्येतीशी संबंधित आव्हानांना पार करत ती नेहमीच चांगले काम करते. याहीवेळी तिने स्वतःचं काम चांगलं केलं आहे. गजबजाटीच्या भागांपासून ते दुर्गम छोट्या शहरांपर्यंत ती स्वतःच्या कामात पूर्ण सक्रिय होती आणि आम्हाला याचे कौतुक आहे’.
हेही पहा –
No Entry Pudhe Dhoka Aahey 2 : कॉमेडीचा धमाका घेऊन येतोय No Entry पुढे धोका आहे 2