नवव्या महिन्यात नेहा धुपियाने केलं बोल्ड अंदाजात मॅटरनिटी शूट

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. नेहा धुपिया सध्या तिच्या गरोदरपणाच्या अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत ती स्वतःची पूर्ण काळजी घेत आहे. यासह, ती तिच्या गरोदरपणाचा खूप आनंद घेत आहे. आता अलीकडेच नेहा धुपियाने तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये नेहा बोल्ड स्टाईल लूकमध्ये दिसत आहे. नेहा धुपियाचे अनेक चाहते या फोटोशूटवर तिचे कौतुक करून तिला त्यावर प्रतिक्रिया देखील करत आहेत.

नेहा धुपिया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडेच नेहा धुपियाने तिचे मॅटरनिटी फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये नेहा धुपियाची बोल्ड स्टाईल चाहत्यांकडून सर्वाधिक पसंत केली जात आहे. बऱ्याच दिवसांपासून नेहा हे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. जे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नुकताच नेहा धुपियाने स्वतःचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नेहा धुपिया तिच्या बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. नेहा धुपियाने ब्रालेट आणि शऑट्स घातले आहे. यासोबत तिने नेट टॉपही घातला आहे. ज्यामुळे तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. याआधी नेहा धुपियाने आणखी एक फोटो शेअर केला होता ज्यात अभिनेत्री पांढरा शर्ट आणि शॉट्स परिधान करताना दिसत होती. यासोबतच नेहाने बूटही घातल्याचे दिसतेय. नेहा धुपियाचे हे सर्व फोटो खूप व्हायरल केले जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)