‘एकतर सेक्स विकतो किंवा शाहरुख खान’, नेहा धुपियाचं २० वर्षांपूर्वीचं ट्विट का होतंय व्हायरल?

Neha Dhupia On Shahrukh Khan Pathaan Film :तब्बल ४ वर्षानंतर कमबॅक करणारा किंग खान पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला. अशात अभिनेत्री नेहा धुपियाचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर नव्य़ाने व्हायरल होत आहे.

Neha-Dhupiya-On Pathaan-Shahrukh-Khan
अभिनेत्री नेहा धुपियाचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर नव्य़ाने व्हायरल होत आहे.

Neha Dhupia On Shahrukh Khan Pathaan Film : शाहरुख खानसह चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट ‘पठाण’च्या यशाने खूप आनंदी आहे. तब्बल ४ वर्षांनंतर कमबॅक करणारा किंग खान पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलाय. पठाण चित्रपट रिलीज होऊन अवघे ४ दिवस झाले असून, चित्रपटाच्या यशाने बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवला आहे. देशातील ४ दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे २०० कोटी रुपये आहे, तर जगभरातील एकूण कलेक्शन ४०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशात अभिनेत्री नेहा धुपियाचं एक जुनं ट्विट सोशल मीडियावर नव्याने व्हायरल होत आहे. ‘एकतर सेक्स विकतो किंवा शाहरूख खान,’ असं नेहा धुपियाने या ट्विटमध्ये म्हटलंय.

२००४ मध्ये अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या ‘जुली’ या चित्रपटात केलेल्या इंटीमेट सीन्सबाबत तिला प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना २० वर्षांपूर्वी तिनं हे वक्तव्य केलं होतं. या चित्रपटात तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. नेहा धुपिया ही नुकतीच ‘पठाण’ चित्रपट पाहण्यास गेली होती. त्यानंतर तिचं हे जुनं ट्विट सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरू लागलंय. एका यूजरने ट्विटरवर नेहाला टॅग करत म्हटलंय की, “दोन दशकांपूर्वी नेहाने सांगितलं होतं की, पडद्यावर एकतर सेक्स विकतो किंवा मग शाहरूख खान…हे वक्तव्य आजही खरं ठरतंय…”

रिल्पाय देत नेहा धुपिया म्हणाली….

यूजरच्या या ट्विटला अभिनेत्री नेहा धुपियाने रिल्पाय देखील दिलाय. यात तिने म्हटलंय की, आज २० वर्षांनंतरही माझं हे वक्तव्य खरं ठरतंय. हे एका अभिनेत्याचं करिअर नव्हे तर एका राजाचं साम्राज्य आहे.”

‘पठाण’साठी नेहाचे कौतुकाचे बोल…

प्रजासत्ताक दिनी मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ पाहिल्यानंतर नेहाने याआधीही समीक्षा केली होती. तिने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट शेअर करत लिहिले की, ‘iamsrkआमच्या मनात तुमच्यासाठीचं जे प्रेम आहे, त्याचं वर्णन करणे कठीण आहे. @Deepikapadukone तू तुझ्या नजरेने किक व ट्रिक्सने स्क्रीन पेटवलीस आणि #JohnAbraham तू खूप वाईट दिसलास! @BeingSalmanKhan आम्ही इतिहासातील सर्वोत्कृष्ट कॅमिओ पाहण्यासाठी पुन्हा थिएटरमध्ये जाऊ #पठाण येथे कायमसाठी आहे!!!’