घरमनोरंजनया खोलीत आम्ही भाड्याने रहायचो; नेहा कक्कर झाली भावूक

या खोलीत आम्ही भाड्याने रहायचो; नेहा कक्कर झाली भावूक

Subscribe

एकेकाळी ज्या शहरात आमचं कुटुंब भाड्याच्या घरात रहायचं. त्याच शहरात आज स्वतःचा बंगला आहे. नेहा कक्करने इंस्टाग्रामवरुन आपल्या घराचे फोटोज् शेअर केले आहे.

आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी गायिका नेहा कक्कर नेहमीच चर्चेत असते. बाॅलीवूडमध्ये गायिका म्हणून ती प्रसिद्ध तर आहेच पण, एक भावूक व्यक्ती म्हणूनही तिची ओळख आहे. रिअॅलिटी शो ‘इंडीयन आयडाॅल’ मधून प्रकाशझोतात आलेली नेहा आज एक यशस्वी आणि लोकप्रिय गायक आहे. नेहाने उत्तराखंडच्या ऋषिकेषमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला होता. आपल्या बंगल्याचे फोटाज् तिने इंस्टाग्रामवर शेअर केले असून त्या पोस्टला भावनात्मक असे कॅप्शन दिले आहे. आपल्या पोस्टमध्ये नेहा म्हणते की, ऋषिकेशमधील हा बंगला आम्ही विकत घेतला आहे. दुसऱ्या फोटोत ते घर आहे. जिथे माझा जन्म झाला. आमचं कुटुंब एकाच खोलीच्या घरात राहत होते. माझ्या आईने एका टेबलवरच किचन तयार केले होते. या घरात आम्ही भाड्याने राहत होतो, आता त्या शहरात स्वतःचा बंगला घेतला आहे. हे भावनिक आहे. माझ्या कुटुंबाचे आणि चाहत्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच तिने #selfmode हा हॅशटॅगही वापरला आहे.

स्पर्धक ते परीक्षक खडतर प्रवास

नेहाचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. सुरूवातीला ती देवीच्या जागरणमध्ये गात होती, त्यासाठी तिली ५०० रुपये मिळायचे. नंतर सिंगिंग रिअॅलीटी शो इंडीयन आयडाॅलमधून स्पर्धक म्हणून संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर नेहाने कधी मागे वळून पाहीलेच नाही. आपल्या खडतर मेहनतीतून ज्या ‘शो’ची ती स्पर्धक होती. त्याच ‘शो’ची ती आता परीक्षक आहे. याशिवाय तिची ऑंख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनिया, मे तेरा बॅायफ्रेंड, काला चष्मा ही गाणी सुपरहिट ठरली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -