घरताज्या घडामोडीती टीव्हीवर रडल्यामुळे लोकांचा विश्वास बसला; हिमांशने ब्रेकअप विषयी सोडले मौन

ती टीव्हीवर रडल्यामुळे लोकांचा विश्वास बसला; हिमांशने ब्रेकअप विषयी सोडले मौन

Subscribe

गायिका नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडने ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे. नेहाचा ब्रेकअप करण्याचा निर्णय असल्याचा हिमांशने सांगितलं आहे.

आजच्या तरुणाईला आपल्या गाण्याने वेड लावणारी गायिका नेहा कक्करच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू होती. ज्येष्ठ गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत नेहा विवाह बंधनात अडणार सर्वत्र पसरले होते. मात्र आता नेहा पुन्हा एकदा तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे. नेहाचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता हिमांश कोहली याने त्याच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे. नेहा कक्करने स्वतः ब्रेकअर केला असल्याचं हिमांशने सांगितलं आहे. ‘ब्रेकअप विषयी मी काही बोलत नसल्यामुळे लोक माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करत आहेत’, असं हिमांश ने एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हिमांशने नेहा कक्करसोबत झालेल्या ब्रेकअप विषयी सांगितलं. तो म्हणाला की, ‘मी नेहासोबत ब्रेकअप केला नव्हता. पण चर्चा सुरू झाल्या आणि सगळ्या गोष्टी बिघडल्या. आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मात्र आज सगळं काही ठीक झालं आहे. पण एक काळ होता जेव्हा संपूर्ण जग सोशल मीडियावरून माझ्यावर टीका करत होत. कोणी सत्य जाणून घेण्यासाठी इच्छूक नव्हतं. सगळ्यांच्या नजरेत मी विलन झालो होतो. मी काहीचं बोलतं नव्हतो याचं फार वाईट वाटतं होत आणि लोकांनी नेहाने सांगितलेल्या गोष्टीवरून माझ्याबाबत मतं तयार केली होती.’

- Advertisement -

हिमांशने त्यानंतर नेहा कक्कर विषयी सांगितलं की, ‘ती टीव्ही कार्यक्रमात रडली आणि सगळ्यांना तिच्यावर विश्वास बसल्यामुळे लोक मला चुकीचे समजू लागले. मात्र मी माझं ठामपणे मत मांडलं. मला देखील खूप बोलावसं वाटतं होतं. एकदा तर मी सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खूप काही लिहिलं होत. पण मी थोडा वेळ थांबलो आणि काही वेळानंतर मी माझा विचार बदलला. कारण मी जिच्यावर प्रेम केलं तिचं ही व्यक्ती होती.’

- Advertisement -

‘ब्रेकअप करण्याच्या निर्णय हा नेहाचा होता. त्यावेळी बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या ज्याबद्दल मला बोलण्याची इच्छा नाही आहे. मी एवढंच सांगू शकतो की तिला हे नातं भविष्यात ठेवायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.’


हेही वाचा – भूमी पेडणेकर न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -