घरमनोरंजननेहा कक्कर एका जमान्यात होती भजनी गायक; आज बॉलिवूडची टॉप गायिका

नेहा कक्कर एका जमान्यात होती भजनी गायक; आज बॉलिवूडची टॉप गायिका

Subscribe

गायिका नेहा कक्कडवर आज वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र नेहाचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास खरच थक्क करणारा आहे.

बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कडचा आज ३१ वा वाढदिवस. नेहाचा सुरेल आवाजाचे आज करोडो चाहते आहेत. आज दिवसभर चाहते नेहावर जन्मदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नेहाचा भाऊ टोनी कक्कडनेही नेहाचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत, तिला शुभेच्छा दिल्या आहे. पण बॉलिवूडमध्ये गाणी गाण्यापूर्वी नेहा देवीच्या मंदिरात भजनं गात असे. जाणून घेवूयात तिचा भजनं ते बॉलिवूडचा थक्क करणारा प्रवास.

मातेच्या मंदिरात मोठ्या बहिणीबरोबर जागरणांमध्ये गाणे

अगदी लहान वयात गायिका नेहा कक्कडने तिची मोठी बहिण सोनू कक्कड बरोबर मातेच्या मंदिरांत भजनं, जागरणांमध्ये गाण्यास सुरूवात केली. या मोबदल्यात नेहाला ५०० रूपये एवढेत मानधन तेव्हा मिळत असे. विशेष म्हणजे, नेहा मंदिरांमध्ये गाते यामुळे तिच्या पालकांना शेजारच्यांच्या टोमण्यांचा सामना करावा लागत असे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत नेहाने भजनं गाणे सुरूच ठेवले. त्यामुळेच ती बॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांमध्ये आज स्वतःचे स्थान निर्माण करू शकली.

- Advertisement -

ज्या शोमध्ये स्पर्धक त्याच शोची आज जज

नेहा कक्कडने २००६ साली सोनी वाहिनीवरील गाण्याच्या रिअॅलिटी शो मधून गाण्याला सुरूवात केली. त्यावेळी ती ११ वीत शिकत होती. त्यावेळी अंतिम फेरी गाठूनही नेहा स्पर्धा जिंकू शकली नाही. मात्र आज ती त्याच स्पर्धेची जज म्हणून धुरा सांभाळत आहे.

या गाण्यामुळे नेहा झाली स्टार

२००८ मध्ये नेहाचा ‘नेहा- द रॉकस्टार’नावाचा पहिलाच अल्बम रिलीज झाला होता. या अल्बममुळे नेहा एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर नेहाचे अनेक अल्बम आले. ज्यामुळे नेहाला बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. आज नेहा बॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे.

- Advertisement -

उंचीवरून उडवली होती खिल्ली

गायिका नेहा कक्कडला अनेकदा तिच्या कमी उंचीवरून चिडविण्यात येत असे. मात्र बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट गाणे देत नेहाने आपली उंची वाढवली. अशाप्रकारे नेहाने तिची खिल्ली उडविणाऱ्यांना समर्पक उत्तर दिले.

तीनही भावंडे बॉलिवूडमध्ये आघाडीवर

सोनू कक्कड, नेहा कक्कड, टोनी कक्कड तीनही भावंडं बॉलिवूडधील संगीत क्षेत्रात आज आघाडीवर आहेत. जरी टोनी कक्कडने हल्लीच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला असला तरी, लहानपणापासूनच टोनी गाण्यांना संगीत देत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -