नेहा कक्करकडे ‘गुड न्यूज’? सासूने दिली पहिली प्रतिक्रिया

thane traffic police appeal who not paid fine for years they have to present at lok adalat
नेहा कक्करकडे 'गुड न्यूज'? सासूने दिली पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्करचे नाव घेतले जाते. हल्लीच नेहाने ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहाने प्रेग्नेंसीबाबत मोठा खुलासा केला आहे. नेहाने सांगितले की, म्युझिक व्हिडीओ ‘ख्याल रख्या कर’ या गाण्यात तिने आर्टिफिशिअल बेबी बंप लावलं होतं. यामुळे तिची सासू देखील हैराण झाली. नेहाने सासूला नेमकं काय वाटलं याचा खुलासा केला आहे.

नेहाच्या या गाण्यामुळे ती चाहत्यांना खरोखर काही गुड न्यूज देतेय अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र यादरम्यानचा तिने हा मजेशीर किस्सा शेअर केला आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये नेहा कक्कर म्हणाली की, खरं सांगू, जेव्हा ख्याल रख्या कर हे गाणं आलं, त्यात माझं पोट पाहून माझी आई म्हणाली, बेटा गुड न्यूज खूप लवकर झाली नाही का?


नेहा कक्करने यावर सासूला सांगितले की, आई, किमान तू असे बोलू नकोस, आपण सर्वांना माहित आहे की आमचे नुकतेच लग्न झाले आहे. नेहा कक्करने या खास एपिसोडमध्ये म्हटलं की, रोहनप्रीतने अगदी घाईगडबडीत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नेहा कक्कर एकामागून एक नवनवे म्युझिक व्हिडिओ शेअर करत आहे. नुकताच तिचा ‘कांता लाग’ हा म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे, जो अधिकचं हिट ठरला. या गाण्यात नेहाचा अतिशय बोल्ड अंदाजात दिसली. या म्युझिक व्हिडिओमध्ये नेहासह हनी सिंग आणि तिचा भाऊ टोनी कक्कर झळकला होता.