घरताज्या घडामोडीBhabhi Ji Ghar Par Hain मालिकेला नेहा पेंडसेचा राम राम !

Bhabhi Ji Ghar Par Hain मालिकेला नेहा पेंडसेचा राम राम !

Subscribe

याआधी मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री सौम्या टंडण अनिता भाभीची भूमिका साकारत होती. त्यानंतर अभिनेत्री नेह पेंडसेला अनिता भाभीच्या भूमिकेसाठी रिप्लेस करण्यात आले.

टेलिव्हीजनवर सतत चर्चेत असलेली मालिका म्हणजे भाभी जी घर पर हैं (Bhabhi Ji Ghar Par Hain ) मालिकेने प्रेक्षकांना आजवर प्रचंड हसवले आहे. मालिका अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यातही अडकली. मालिकेच्या कथा अनेकांच्या पसंतीस उतरली तर अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला.  अंगूरी भाभी, अनीत भाभी, विभूती आणि तिवारी सारख्या पात्रांनी भाभी जी घर पर हैंच्या प्रेक्षकांना हसवले.  मालिकेतील सर्वांची लाडकी अनिता भाभी म्हणजेच अभिनेत्री नेहा पेंडसेने (neha pendse ) मात्र मालिकेला राम राम ठोकला आहे. मालिकेचे निर्माते सध्या नव्या अनिता भाभीच्या शोधात आहेत.

ई टाइन्सच्या माहितीनुसार, अनिता भाभीच्या रोलसाठी निर्माते सध्या ऑडिशन्स घेतल आहेत. पुढच्या काही आठवड्यात नवीन अनिता भाभी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री सौम्या टंडण अनिता भाभीची भूमिका साकारत होती. त्यानंतर अभिनेत्री नेह पेंडसेला अनिता भाभीच्या भूमिकेसाठी रिप्लेस करण्यात आले. एप्रिल २०२२मध्ये नेहाचे काँन्ट्रक्ट संपणार असून नेहाला मालिका पुढे नेहाला मालिकेत पुढे काम करायचे नाहीये त्यामुळे निर्माते आता नव्या अनिता भाभीच्या शोधात आहेत.

- Advertisement -

मीडिया रिपोर्टनुसार, नेहाला मालिका करण्यात आजिबात रस नाही. सुरुवातीला आपण ही भूमिका निभावू असे वाटले होते. मात्र एका वर्षातच ती या भूमिकेला कंटाळली असून तिला ही भूमिका आता करायची नाहीये. निर्माते अनेक दिवस अनिता भाभीसाठी नवा चेहरा शोधत असून पिया अलबेला फेम शीन दासचे नाव फायनल केल्याचे सांगण्यात येत आहे. निर्मात्यांकडून मात्र याविषयी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.


हेही वाचा –   Gangubai Kathiawadi trailer आधीच आला अजय देवगणचा लूक, म्हणाला- येतोय आम्ही

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -