घरमनोरंजन'जय माहिष्मती' आता नेटफ्लिक्सवर, बाहुबलीचा प्रीक्वल येणार

‘जय माहिष्मती’ आता नेटफ्लिक्सवर, बाहुबलीचा प्रीक्वल येणार

Subscribe

जगभरातील बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई करणाऱ्या बाहुबली या चित्रपटाच्या दोन भागांनंतर आता बाहुबलीचा एक प्रीक्वल आपल्या समोर येणार आहे. नेटफ्लीक्स या ऑनलाईन कंपनीने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. लवकरच बाहुबली वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे.

बाहुबली या भारतीय चित्रपटाने जगभर बक्कळ कमाई केली. भारतात तुफान गाजलेल्या या चित्रपटाचा दुसरा पार्टदेखील रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने तर १ हजार ७०० कोटीहून अधिक कमाई केली. चित्रपटाच्या दोन्ही भागांनी जगभर भारतीय चित्रपटांचा डंका वाजवला. आता या चित्रपटाचा प्रीक्वल येणार आहे. नेटफ्लिक्स ही कंपनी ऑनलाईन कंपनी बाहुबलीचा प्रीक्वल प्रदर्शित करणार आहे. या प्रीक्वलमध्ये बाहुबलीचा सुरूवातीचा भाग दाखविण्यात येणार आहे. बाहुबलीच्या जन्माच्या अगोदरचा काळ आणि कथा यामध्ये पहायला दिसेल. त्यामुळे जगभरातील बाहुबलीच्या चाहत्यांना पुन्हा एकदा महिष्मती साम्राज्य पाहता येणार आहे. परंतु थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने हा प्रीक्वल आपल्या समोर येणार आहे. बाहुबलीचे रूप आपण चित्रपटाच्या माध्यमातून पाहिले. परंतु बाहुबलीचा प्रीक्वल मात्र एका वेबसिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे. एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या ब्लॉकबस्टर बाहुबलीच्या प्रीक्वलमध्ये शिवगामीदेवीचा प्रवास दाखवला जाणार आहे. नेटफ्लिक्सने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. या वेब सिरीजचे नाव असेल ‘बाहुबली बिफोर दी बिगनिंग’. याआधी ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ‘बाहुबली बिफोर दी बिगनिंग’ ही वेबसिरीज लेखक आनंद नीलकंठन यांचे पूस्तक ‘दी राइज ऑफ शिवगामी’ यावर आधारीत आहे. या वेबसिरीजमध्ये एकूण ९ एपिसोड्स असणार आहेत.

- Advertisement -

कशी असेल बाहुबली बिफोर दी बिगनिंग

९ एपिसोड्सच्या या सिरीजमध्ये शिवगामीदेवीचा (भल्लादेव याची आई) प्रवास पाहता येईल. यामध्ये शिवगामीदेवीचा ‘सुडाच्या आगीने पेटलेली तरुणी ते एक बुद्धीमान आणि अद्वितीय राणी होण्यापर्यंतचा प्रवास’ पहायला मिळणार आहे. या सिरीजसाठी नेटफ्लिक्सने राजामौली यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. राजमौली यांच्यासोबत देवा कट्टा आणि प्रवीण सतारु हे दोघे या वेबसिरीजचे सहदिग्दर्शन करणार आहेत.

कोण होणार शिवगामीदेवी

नेटफ्लिक्सने बाहुबलीच्या प्रीक्वलची घोषणा केल्यापासून सर्वत्र केवळ त्याचीच चर्चा आहे. या प्रीक्वलमध्ये शिवगामीदेवीची कथा पहायला मिळणार आहे. त्यामुळे सिरीजमध्ये शिवगामीदेवीची भूमिका कोण करणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच यामध्ये नायकाच्या भूमिकेत कोण दिसेल, किंवा या सिरीजमध्ये नायक असेल का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -