मराठी कलाकारच एकमेकांचा अपमान करतात… अशोक मामांच्या अपमानावरून नेटकऱ्यांची स्वप्नील जोशीवर टीका

नुकत्याच काही दिवसांपूर्वी 'चला हवा येऊ द्या'मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वयाची पंचाहत्तरी आणि अभिनय क्षेत्रातील कारर्कीदीची पंन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आले होते

मागील ८ वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोद कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गणेश भारतपुरे, सागर कारंडे, डॉ. निलेश साबळे या संपूर्ण टीमने मराठी प्रेक्षकांना अगदी भूरळ पाडलेली आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या नवीन पर्वात अभिनेता स्वप्नील जोशी देखील सहभागी झाला होता. दरम्यान, आता या कार्यक्रमाबाबत आणि अभिनेता स्वप्निल जोशीबाबत मराठी प्रेक्षक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.

खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वयाची पंचाहत्तरी आणि अभिनय क्षेत्रातील कारर्कीदीची पंन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आले होते. या एपिसोड चांगला पार पडला. मात्र, टेलिकास्ट झाल्यानंतर या एपिसोडमधील एक गोष्ट प्रेक्षकांना खटकली. तसेच याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

तसेच या एपिसोडनंतर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी कियारा अडवाणी आणि वरूण धवन यांच्यासोबत आले होते, तेव्हा अनिल कपूर यांचा आदर राखत स्वप्नील जोशी मोठ्या खुर्चीतून उठून त्यांच्यासोबत खाली येऊन बसला. मात्र जेव्हा अशोक सराफ आले होते, तेव्हा त्याने असं काहीही केलं नाही. चाहत्यांच्या मते, मराठी कलाकारचं मराठी कलाकारांचा मान राखत नाहीत, पण हिंदी कलाकारांचा मान राखतात.

स्वप्नील जोशीच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत, तसेच त्याच्यावर अनेक मिम्सही करण्यात आले आहेत.

 


हेही वाचा :जोपर्यंत बॉलिवूडमध्ये किंग, बादशाह आणि सुलतान असतील…;विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट चर्चेत