घरमनोरंजनकाजोलचा बर्थडे व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले तू या सर्वांच्या लायक नाहीये

काजोलचा बर्थडे व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले तू या सर्वांच्या लायक नाहीये

Subscribe

काजोलचा ॲटीट्यूड पाहून नेटकरी आता चांगलेच संतापले आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने नुकतच तिचा 47 वा वाढदिवस साजरा केला होता. काजोलला या खास दिवशी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या इतकचं नाही तर काजोलचा दिवस आणखी स्पेशल बणवण्यासाठी काही चाहते केक घेऊन तिच्या घरा बाहेर येऊन उभे राहीले होते. काजोलच्या चाहत्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काजोलचा घमंडीपणा पाहून चाहत्यांनी काजोलच्या वागणुकीवर सवाल उपस्थीत करत तिला चांगलेच फटकारले आहे. काजोलचा ॲटीट्यूड पाहून नेटकरी आता चांगलेच संतापले आहे. यानंतर त्यांनी काजोलला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

नेमकं काय घडलं-

- Advertisement -

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला पाहून नेटकरी प्रचंड संतापले असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काजोल घराबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांच्या भेटीला येते तसेच त्यांनी आणलेला केक कटींग करते. याचदरम्यान काही फॅन्स काजोल जवळ जाऊन केक पुढे करतात. पण काजोल लांब हात करुन दूरुनच केक कापण्याचा प्रयत्न करते. काही सेकेंद काजोल थांबते व घरामध्ये निघून जाते. काजोलची अशी वागणूक पाहून चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. तसेच काजोलचा असा स्वभाव पाहून सोशल मीडियावर तिच्यावर टिकेची झोड उठत आहे. एका युजरने लिहले की ,”खूप घमंडी बाई आहे. या व्हिडिओला डिसलाईक बटन सुद्ध असायला हवं होतं” तर एकाने लिहलं “अशी ॲक्टींग करत आहे जसे की आमच्यावर उपकार करते”

व्हिडिओ पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

काजोलचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तब्बल 11.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. आपल्या व्यावसायिक तसेच खाजगी जीवनातील घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात परंतू आलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी काजोलवर नाराजी व्यक्त केली आहे.

नेटकरी काय म्हणाले-


हे हि वाचा – Drugs Case: दीपिका पदुकोणच्या एक्स मॅनेजरची अंतरिम जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -