जनाची नाही तर मनाची…. तू मलायका नाहीस; उर्वशी ढोलकियाच्या ‘या’ फोटोंवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया मागील अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतील कोमोलिका या व्यक्तीरेखेने तिला ओळख मिळवून दिली. आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये उर्वशी ढोकलियाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

43 वर्षांची उर्वशी ढोलकिया सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. उर्वशी ढोलकिया वारंवार स्वतःचे नवनवीन ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. कधी कधी या फोटोंमुळे तिला ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. दरम्यान, अशातच उर्वशीने मोनोकिनीतील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI (@urvashidholakia)

उर्वशी ढोलकिया सध्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिने हे फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “लोक मला जंगली म्हणतात… आणि हे मला मान्य आहे”, असं उर्वशीने लिहिलंय.

दरम्यान, उर्वशी ढोलकियाचे हे बोल्ड फोटोपाहून अनेकजण तिला ट्रोल करु लागले आहेत. एकाने ट्रोलरने लिहिलंय की, “तुझ्या वयाकडे बघ एकदा, तुला हे शोभत नाही”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, तू मलायका अरोरा नाहीस, क्षितिजचा आई आहेस तू” अश्या कमेंट्स केल्या आहेत.

कोण आहे उर्वशी ढोलकिया?

उर्वशी ढोलकिया ही हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. उर्वशीने ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. तसेच ती ‘बिग बॉस 6’ ची विजेती देखील आहे. उर्वशीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्वशीने वयाच्या 16व्या वर्षी लग्न केले होते. त्यानंतर वर्षभरातच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, हे लग्न जास्त काळ टिकले नाही. उर्वशी ही ‘नागिन 6’, ‘चंद्रकांता’ या मालिकेत झळकली होती.


हेही वाचा :

Photo : सोना कितना सोना है… सोनाक्षी सिन्हाच्या हटके लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया