Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन सोशल मीडिया माझ्या सौंदर्याला पात्र नाही... कंगनाच्या ट्वीटवर नेटकऱ्यांचा निशाणा

सोशल मीडिया माझ्या सौंदर्याला पात्र नाही… कंगनाच्या ट्वीटवर नेटकऱ्यांचा निशाणा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या विविध कारणांमुळे चर्चेत असते. आत्तापर्यंत कंगनाने तिच्या आयुष्यात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. धाकड गर्ल कंगना नेहमीच सामाजिक किंवा राजकिय मुद्दांवर भाष्य करत असते. अनेकदा कंगना बॉलिवूडमधील कलाकारांवर देखील टीका करताना दिसून येते. दरम्यान, अशातच कंगना तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे.

कंगना रनौतने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्या आजूबाजूला अनेक फुलं दिसत आहेत. कंगनानेही हातात फुलं धरली आहेत. या फोटोसोबत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “बाय द वे, सोशल मीडिया माझ्या सौंदर्याला पात्र नाही… पण, चला तुम्ही पण काय लक्षात ठेवाल…” असं कंगना म्हणाली.

कंगना ट्रोलर्सच्या निशाण्यावर

- Advertisement -

कंगना रनौतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर कमेंट करून यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिलंय की, ‘तू सुंदर आहेस पण माझ्यासारखी सुंदर नाहीस.’ कंगनाला उत्तर देताना एकाने लिहिलंय की, ‘बाय द वे, तू माझ्या लाईक्स आणि कमेंट्सचीही पात्र नाहीस…’ काही जणांनी ऋतिक रोशनचं नाव घेऊन तिला ट्रोल केलं आहे.


हेही वाचा :

‘आदिपुरुष’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -