घरमनोरंजनVideo: टॅटू काढताना भीती वाटली नाही? ओव्हरऍक्टिंग, लस घेण्यावरून मिताली मयेकर ट्रोल

Video: टॅटू काढताना भीती वाटली नाही? ओव्हरऍक्टिंग, लस घेण्यावरून मिताली मयेकर ट्रोल

Subscribe

अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारलेल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे मितालीने प्रेक्षकांची मनं जिंकली. मिताली सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. मिताच्या तिच्या बोल्ड फोटो आणि नवनव्या प्रोजेक्टमुळे कायमच चर्चेत असते, मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेचा विषय ठरली आहे. मितालीने नुकताच कोरोनाविरोधी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. मात्र या व्हिडिओवरून आता अभिनेत्रीला मोठ्याप्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

मिताली मयेकरने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती कोरोनाविरोधी लसीचा पहिला डोस घेताना दिसत आहे. मात्र लस घेताना ती थोडं जास्तचं घाबरताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये इंजेक्शनला पाहून अधिकचं अस्वस्थ झाल्याची दिसतेय. मात्र व्हिडिओमधील मितालीच्या अस्वस्थपणा पाहून अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इतके टॅटू काढूलेस तेव्हा भीती नाही का वाटली? आता इतक्या इंजेक्शनला घाबरतेयस असं म्हणत नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत.

- Advertisement -

एका युजर्सने कमेंट करत म्हटले की, ‘सो मच ओव्हरऍक्टिंग’, तर दुसऱ्या एक युजर्सने ‘इतके टॅटू काढलेस तेव्हा भीती वाटली नाही का?’ असा सवाल विचारला आहे. अशा भन्नाट भन्नाट कमेंट्समधून मितालीवर टीकांचा भडीमार सुरु आहे.

- Advertisement -

मिताली मयेकरला मराठीतील एक सुंदर आणि डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र लस घेतानाचा तिचा ड्रामा चाहत्यांना बिलकूल आवडलेला नाही. मिताली फ्रेशर्स, तु माझा सांगाती, उंच माझा झोका, भाग्यलक्ष्मी, असंभव या मालिकांमध्ये अभिनय साकारून घराघरांत पोहचली. याशिवाय तिने ‘बिल्लू बारबर’ या हिंदी चित्रपटातून इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मितालीने ‘उर्फी’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केल. त्यानंतर तिने यारी दोस्ती, आम्ही बेफिकर या मराठी चित्रपटांमध्ये काम केल.

झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या नव्याने सुरू झालेल्या मालिकेने अगदी काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बाॅय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसह मिताली मयेकर   २ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. यानंतर नुकतचं दोघांनी लग्न केले.


Bigg Boss Marathi 3 : कीर्तनकार शिवलीला पाटील ‘बिग बॉस ‘च्या घरातून बाहेर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -