घरमनोरंजन'हंगामा तर तुझ्या नवऱ्याने केला'...हंगामा2'चं गाण रिलीज होताच शिल्पा झाली ट्रोल

‘हंगामा तर तुझ्या नवऱ्याने केला’…हंगामा2’चं गाण रिलीज होताच शिल्पा झाली ट्रोल

Subscribe

गाणं प्रदर्शित होताच शिल्पावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल १४ वर्षांनंतर ‘हंगामा २’ या चित्रपटाद्वारे कमबॅक करत आहे. तसेच २३ जुलैला हा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार असल्यामुळे शिल्पाच्या चाहत्यांमध्ये एक प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती, कारण बऱ्याच काळानंतर शिल्पा चित्रपटात दिसणार होती. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर शिल्पाला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. कारण शिल्पाचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्मप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नुकतच ‘हंगामा2’ या सिनेमाचा टायटल ट्रॅक ‘हंगामा हो गया’ रिलीज करण्यात आले आहे. आणि हे गाणं प्रदर्शित होताच शिल्पावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. गाण्यामध्ये शिल्पा अत्यंत बोल्ड अँन्ड ग्लॅमरस अवतारात दिसत असून तिच्या या अंदाजाला आता चाहत्यांनी भूलून न जाता तिच्यावर निशाणा साधला आहे. एका युजरने लिहले आहे की, ‘हंगामा तर शिल्पा शेट्टीच्या पतीने केला आहे.’ तर एकाने लिहले ‘पत्नी योगा करते तर पती पॉर्न बनवतो.’ सध्या शिल्पा तिच्या पतीमुळे नेटकऱ्यांच्या कचाट्यात सापडली आहे. तसेच शिल्पावर अनेक मीम देखील व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

2003 साली रिलीज झालेल्या हंगामा या सिनेमाचा हंगामा2 हा सीक्वल असून प्रियदर्शनने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. हंगामा 2 मध्ये परेश रावल, मिझान जाफरी,आशुतोष राणा,राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका आहेत. शिल्पाने सांगितले की, ‘तिचा कमबॅक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत नाही आहे. यात तिची काही हरकत नाही. याबाबत तिला चिंता नाही आहे. ओटीटीवरील कंटेंट सर्वात महत्त्वाचा असतो आणि हा कॉमेडी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे जास्त लोकं पाहतील.’ पण आता शिल्पाच्या पतीने केलेल्या कृत्यामुळे हंगामा2 ओटीटीवर कीतपत हंगामा घालू शकेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गाणं पाहा-

 


हे हि वाचा – निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’चे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -