घरमनोरंजन'आदिपुरुष' मधील हनुमानाच्या लूकवर नेटकरी संतापले

‘आदिपुरुष’ मधील हनुमानाच्या लूकवर नेटकरी संतापले

Subscribe

दिग्दर्शक ओम राऊतचा आगामी ‘आदिपुरूष’ चित्रपट सध्या मोठ्या प्रामाणात चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि व्हिडीओ पाहून अनेक दिग्गजांपासून ते सामान्यांपर्यंत अनेकजण टिका करत आहेत. काहींना प्रभासच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा टीझर आवडला आहे, तर काहींचा याला प्रचंड विरोध आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी चित्रपटातील रावणाची भूमिका साकारलेल्या सैफ अली खानची खिल्ली उडवली जात होती. आता त्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटात हनुमान ही भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेवरला देखील ट्रोल केलं जात आहे.

‘आदिपुरूष’च्या टीझरची सोशल मीडियावर चर्चा

- Advertisement -

- Advertisement -

प्रभास आणि कृति सेननचा ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रावणाच्या लूकची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात होती. त्यानंतर आता हनुमानाच्या लूकला देखील ट्रोलर्स मोठ्या प्रमाणात ट्रोल करू लागले आहेत. सोशल मीडियावर नेटकरी चित्रपटातील लूकबाबत नाराज आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “कोणता हिंदू मिशी न ठेवता दाढी वाढवतो”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हनुमानाला मौलाना रूपामध्ये दाखवण्यात आलं आहे”. अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स लोक करू लागले आहेत.

‘आदिपुरूष’ या 5 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, सध्या या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात आहे.


हेही वाचा :

विरोध करणाऱ्यांनी रावण कधी पाहिलाय का? असं म्हणत मनसेचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पाठिंबा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -