‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेत दोन मैत्रिणी दिसणार पुन्हा एकत्र; होणार ‘या’ अभिनेत्रीची एंट्री

मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक या मालिकेत असून मनवाच्या कॉलेजमधल्या जोडीदाराची आता एंट्री होणार आहे.

तुमची मुलगी काय करते(tumchi mulgi kay karate) या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्तथरारक कथा असलेल्या ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट प्रेक्षकांनी आतपर्यंत पहिले आहेत. त्यात भर घालत या मालिकेत रुईया कॉलेजमधून एकत्र नाटक, एकांकिका करत आज कलाविश्वात उत्तम अभिनेत्री असलेल्या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर या मालिकेदरम्यान पुन्हा एकत्र छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

हे ही वाचा – सोनम कपूरच्या मुलाचं पार पडलं बारसं; फोटो शेअर करत ठेवलं ‘हे’ अनोखं नाव

‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक(actress manava naik) या मालिकेत असून मनवाच्या कॉलेजमधल्या जोडीदाराची आता एंट्री होणार आहे. हा निवळ योगायोग आहे. ‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेत अभिनेत्री क्षिती जोगची(kshitee jog) एंट्री होणार आहे. क्षिती जोग या मालिकेत पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – महेश टिळेकर दिग्दर्शित बहुचर्चित ‘हवाहवाई’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम करण्याची मिळालेली संधी मनवा आणि क्षिती यांना पुन्हा एकदा त्यांच्या कॉलेजलाईफच्या फ्लॅशबॅकमध्ये नेईल यात शंकाच नाही. अभिनेत्री मनवा नाईक तर आधीपासूनच मालिकेत प्रेक्षकांना दिसते आहे. मात्र आता क्षितीला पोलिसाच्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. कॉलेज लाईफ पासून एकत्र असलेल्या दोन मैत्रिणी आज कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

हे ही वाचा – आपल्या घरीही आई, बहिणी आहेत…चंदीगड व्हिडीओ कांड प्रकरणात अंकिताची पोस्ट चर्चेत