Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अपारशक्ती खुरानाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार

अपारशक्ती खुरानाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार

वडील बनण्याच्या आनंदात अपारशक्तीने आपल्या बायको सोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना(Aparshakti Khurana) याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. लवकरच अपारशक्तीच्या घरी लहान बाळाचे आगमन होणार आहे. वडील बनण्याच्या आनंदात अपारशक्तीने आपल्या बायको सोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अपारशक्ती आणि आकृती आहुजा बेबी बंब सोबत फोटोमध्ये दिसत आहे. तसेच अपारशक्ती बेबी बम कीस करताना दिसत आहे. या सुंदर फोटोला कॅप्शन देत अपारशक्तीने लिहले आहे की,” लॉकडाउन मध्ये निश्चितच काही कामं झाली नाहीत,तर आम्ही विचार केला कुटुंब वाढवूया” अश्या मजेशीर अंदाजात कॅप्शन देत अपारशक्तीने ही गुड न्युज फॅन सोबत शेअर केली आहे.
अपारशक्तीच्या या पोस्ट वर अनेक सेलिब्रिटी तसेच चाहते भरभरून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अपारशक्ती आणि आकृती आहूजा यांच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली आहे. दोघांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांचीही पहिली भेट चंदीगड मधील एका डांस क्लास दरम्यान झाली होती. आणि तेव्हा पासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. काही काळाने दोघांनी कुटुंबाच्या संमतीने लग्न केलं.

- Advertisement -

अपारशक्तीच्या वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास ‘दंगल’, ‘स्त्री’, ‘लुका छुपी’, ‘पति, पत्नी और वो’,‘स्ट्रीट डांसर
मध्ये झळकला होता.


हे हि वाचा – Mumbai Lockdown दरम्यान इव्हिनिंग वॉक करणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांनी पोलिसांनी अडवलं आणि…

- Advertisement -