Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन New Heart Breaksong:‘वफा ना रास आयी’ गाणं प्रदर्शित!

New Heart Breaksong:‘वफा ना रास आयी’ गाणं प्रदर्शित!

‘वफा ना रास आयी’ या गाण्यातील मुख्य अभिनेत्री आरुषी निशंक एक प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची मुलगी आहे.

Related Story

- Advertisement -

कश्मिरच्या सुंदर खोऱ्यांत चित्रीकरण करण्यात आलेलं ‘वफा ना रास आयी’नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हिमांश कोहली, आरुषी निशंक आणि रोहित सुचांती अभिनीत हे गाणं टी सीरिजच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा याला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. ‘वफा ना रास आयी’ हे गाणे झुबिन नौटियाल आणि यांनी गायले असून आशिष पांडा यांनी दिग्दर्शित केले आहे. तसेच रश्मी विराग लिखित या गाण्याला मित बदर्स यांनी संगीत दिले आहे.

- Advertisement -

‘वफा ना रास आयी’ या गाण्यातील मुख्य अभिनेत्री आरुषी निशंक एक प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची मुलगी आहे. ‘वफा ना रास आयी’ हे आरुषि निशंकचे पहिले गाणे आहे. नुकतीच आरुषीने तिच्या ‘तारिणी’ चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. शूटिंगच्या अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली, शूटिंग प्रामुख्याने श्रीनगरमध्ये झाले आणि हिमवृष्टी टाळण्यासाठी आम्हाला सकाळी सुरुवात करावी लागली. हवामानामुळे हे खरोखरच आव्हानात्मक होते, परंतु माझ्या सहकलाकार हिमांश कोहली आणि रोहित सुचांती यांनी उत्कृष्ट काम केले. या म्युझिक व्हिडिओसाठी मी खूप कष्ट केले कारण हा माझा पहिला प्रकल्प असल्याचे आरुषीने सांगितले. वफा ना रास आय हे एक सुंदर गाणे आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांचा हा ट्रॅक आवडला असेल. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jubin Nautiyal (@jubin_nautiyal)

- Advertisement -

गाण्याबद्दल बोलताना झुबिन नौटियाल म्हणतात की, ”अशी गाणी लोकांशी जोडतात, जे तुमच्या मनाला स्पर्श करतात आणि तुमच्या प्रेमाची आठवण करून देतात. वफा हे फक्त एक गाणे नाही, तर ही एक कथा आहे आणि जेव्हा एखादा कलाकार मनापासून स्पर्श करतो तेव्हाच ती कला व्यक्त करू शकतो. ‘वफा ना रास आयी’चा व्हिडिओ आपल्याला नक्कीच भावूक करेल.


हे वाचा-  भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड १९ विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

- Advertisement -