घरमनोरंजन‘बोगदा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘बोगदा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

प्रत्येक नात्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची दिशा दाखवणारा 'बोगदा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आजारी आई आणि तिची मुलगी मृण्मयी देशपांडे यांच्यांतील नातेसंबंधावर हा चित्रपट आधारीत आहे.

इच्छामरणाच्या अनेक घटनामुळे व्यक्ती आणि कुटुंबावर होणारा परिणामावर भाष्य करणारा ‘बोगदा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सुरूवातीला बोगदा या नावावरून हा एखाद्या गुढ विषयावर आधारित चित्रपट असवा असा समज झाला होता. मात्र नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंज करण्यात आला. आई आणि मुलीच्या नात्याची दुसरी नाजूक बाजू बोगदा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

असा आहे चित्रपट

आजारी आई म्हणजेच सुहास जोशी आणि तिची मुलगी मृण्मयी देशपांडे यांच्यांतील नातेसंबंधावर हा चित्रपट आधारित आहे. आईचे आजारपण आणि स्वत:ची स्वप्न यांच्यामध्ये अडकलेल्या या मुलीची ही कथा आहे. त्यात आई आपल्या आजारपणाला कंटाळून मुलीकडे इच्छामरणाची मागणी करते. त्यामुळे आता नेमके काय करयाचे या पेचात ही मुलगी अडकते. ती आईला इच्छेखातर स्वेच्छामरण देण्याचा कठीण विचार करेल का? याचे गूढ या चित्रपटात उलघडणार आहे.

- Advertisement -

चित्रपटातील कलाकार

या चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन निशिता केणी यांनी केलं असून अभिनेत्री सुहास जोशी, मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता रोहीत कोकाटे मुख्य भुमिकेत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रत्येक नात्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची दिशा दाखवणारा आहे.

चित्रपट लिखाणाचा आणि दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. माझा पहिला चित्रपट हा मला भावलेल्या कथेवर असावा अशी माझी इच्छा होती. आजारपण हे मी खूप जवळून अनुभवलेलं आहे. माझी आजी आजारी असताना डॉक्टरांनी जेव्हा निर्णय व्हेंटीलेटरवर ठेवण्याचा घ्या, असं सांगितलं तेव्हा आमची झालेली अवस्था वाईट झाली होती. त्यानंतर मी अशाविषयावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री आहे.  – निशिता केणी, लेखिका- दिग्दर्शिका

- Advertisement -

माझ्या पहिल्या सिरीअलमध्ये ही सहास ताई होत्या. त्यामुळे तीचं आणि माझं एक वेगळं नातं तयार झालं आहे. तिला अभिनय करताना बघणं ही एक शाळा असते. केवळं तिच्याकडे बघून आपण खूप काही शिकतो. मराठीतसध्या वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट येत आहे. तसाच बोगदा हा चित्रपट आहे. जेव्हा आपली आईच आपल्याकडे एकमेव इच्छामरणाची मागणी करते तेव्हा मुलीची काय अवस्था होत असेल ते म्हणजे बोगदा हा चित्रपट.  – मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -