घरमनोरंजन'दोस्तीगिरी' प्रेक्षकांच्या भेटीला

‘दोस्तीगिरी’ प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

'दोस्तीगिरी' हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत नुकतेच लाँच झाले आहे.

महाविद्यालयातल्या नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्याविषयी असलेल्या ‘दोस्तीगिरी’ हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘दोस्तीगिरी’चा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा!

‘दोस्तीगिरी’ या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीताचा अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. ट्रेलर आणि म्युझिक लाँचसाठी सिनेमाचा नायक संकेत पाठकचे ऑनस्क्रीन आई-वडील उपस्थित होते. तर दुहेरी मालिकेतली संकेतची आई, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि छत्रीवाली मालिकेत संकेत पाठकच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले अभिनेते अशोक शिंदे यांच्याहस्ते सिनेमाचे संगीत अनावरण झाले आहे. या सिनेमाचे ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळ्यासाठी संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल, शुभांगी लाटकर आणि अक्षय वाघमारे या कलाकारांसह संगीत दिग्दर्शक रोहन, प्राजक्ता शुक्रे, मिनल जैन आणि कविता राम म्युझिक टीम देखील उपस्थित होती.

- Advertisement -
Dostigiri Music launch
दोस्तीगिरीचा ट्रेलर लाँच

हे कलाकार करणार भूमिका

‘दोस्तीगिरी’ या सिनेमाचे दिग्दर्शन विजय शिंदेने केले असून याचे लेखन मनोज वाडकर यांनी केले आहे. तर संतोष पानकर हे सिनेमाचे निर्माते आहेत. तर रोहन यांच्या संगिताने सजलेल्या या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

“माझ्या पहिल्या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा आणि त्यात माझे ऑनस्क्रिन आई-वडिल आशिर्वाद द्यायला आले, हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. दोस्तीगिरी सिनेमाचे चित्रीकरणही माझ्यासाठी आठवणीतले होते. कारण ह्या सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी अक्षय वाघमारे, विजय गीते, पुजा जयस्वाल, पुजा मळेकर असे जिवाभावाचे फ्रेंड्स मला मिळाले.”  संकेत पाठक, अभिनेता

- Advertisement -

“जशी दोस्तीगिरी सिनेमात घट्ट मैत्री दाखवली गेलीय, तशीच अशोक शिंदे आणि माझीही गेल्या तीस वर्षांची घट्ट मैत्री आहे. त्यामुळे माझ्या जुन्या मित्रासोबत दोस्तीगिरी सिनेमाचा ट्रेलर लाँच करणे माझ्यासाठी खूप खास आहे. तसेच संकेत पाठकची मी ऑनस्क्रिन आई झाले होते. तेव्हापासूनच माझी संकेतशीही दोस्तीगिरी सुरू झाली आहे.”  – निवेदिता सराफ, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -