घरताज्या घडामोडी'माई's स्पेशल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘माई’s स्पेशल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

आईच्या त्यागाचे मोल जपणारा 'माई's स्पेशल' चित्रपट

आई कुठे काय करते? असे कित्यकेदा रागात बोलून जातो मात्र कोणतीही तक्रार न करता ती तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असते. परिस्थितीनुसार स्वतःत बदल करून ती माय वेळ निभावते मात्र त्यावेळी तिच्यातले आईपण, एक गृहिणी म्हणून मांडलेल्या संसाराला ती गालबोट लागू देत नाही. अशा या आईच्या त्यागाचे मोल जपणारा ‘माई’s स्पेशल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.(new marathi movie ‘Mai’s Special’ will be released soon)

“काक माय एंटरटेनमेंट” अंतर्गत निर्माती सौ. मंदाकिनी किशोर काकडे निर्मित आणि महेश कोले प्रस्तुत आई या अत्यंत भावस्पर्शी नात्याला एक वेगळे वळण घेऊन हा चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक मंगेश नरे हे या चित्रपटाची धुरा सांभाळणार आहेत. तर चित्रपटाची कथा ही लेखक किरण माने आणि नितीन सावळे यांनी लिहिली आहे. जसराज-सौरभ यांनी चित्रपटाला संगित दिले आहे. ‘माई’s स्पेशल’ चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

माई आपल्या मुलांच्या पाठीशी आणि संसारासाठी वेळप्रसंगी आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी तिच्यातील अवगत कलागुण कशी जोपासते याचे महत्व पटवून देणारा हा ‘माई’s स्पेशल’ चित्रपट प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा विषय नक्कीच आहे. अशा या अगाध नात्याची महती सांगणारा चित्रपट केव्हा येतोय याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत.


हेही वाचा – Photo: नटून थटून सईने साजरी केली पहिली वटपौर्णिमा

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -