घरमनोरंजनतुझीच रे म्युझिकल लव स्टोरी

तुझीच रे म्युझिकल लव स्टोरी

Subscribe

चित्रपट म्हटला की प्रेमप्रकरण हे आलेच. आंतरजातीय प्रेम असेल तर दोन कुटुंब, दोन समाज इतकेच काय तर दोन धर्म यांचा विचार प्रामुख्याने या कथानकात केला जातो. प्रेमापेक्षा समाजातील रितीरीवाज, जातीभेद हा या कथेचा मुख्य गाभा असतो. प्रेम सुरळीत पार पडते; पण विवाहबद्ध होण्याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मात्र मानवी मनाचे कंगोरे उलगडायला लागतात. प्रवीण कारळे याने आपल्या दिग्दर्शनात तुझीच रे हा चित्रपट तयार केलेला आहे. मराठी मुलगी आणि ख्रिश्चन मुलगा अशी ही कथा आहे जी प्रेमापासून सुरू होते आणि पुढे समाज व्यवस्थेपर्यंत येऊन थांबते. प्रवीणने या भूमिकेसाठी नव कलाकारांची जोडी पडद्यावर आणलेली आहे. अक्षय कांबळी आणि प्रियंका यादव हे दोघेही ही भूमिका साकार करणार आहेत. यांच्यासोबत मिलिंद गवळी, सुमुखी पेंडसे, आनंदा कार्येकर, प्रतिभा शिंपी यांचा कलाकार म्हणून सहभाग आहे. संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे. फ्रान्सिस जिगूल, अनिरुद्ध काळे यांनी या चित्रपटाला संगीत दिलेले आहे. म्युझिकल लव स्टोरी म्हणून हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -