घरमनोरंजनमाहेरपणाला कंटाळलेल्या सखीची भन्नाट गोष्ट

माहेरपणाला कंटाळलेल्या सखीची भन्नाट गोष्ट

Subscribe

अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेतून एक अनोखी माहेरवाशीन पाहायला मिळणार

लग्न झालेल्या मुलीला कोणती गोष्ट सर्वात प्रिय असेल तर ती म्हणजे तिचं माहेर, आणि याच माहेरी नवऱ्याबरोबर जाऊन राहण्याची संधी तिला मिळाली तर? लग्नानंतर स्त्रियांच्या मनाची होणारी ही घालमेल अनेक चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मात्र, अस्सं माहेर नको गं बाई या मालिकेतून एक अनोखी माहेरवाशीन पाहायला मिळणार आहे. सोनी मराठीवर लवकरच अस्सं माहेर नको गं बाई ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून एका कुटुंबात घडणाऱ्या धमाल गोष्टी पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबात लेकीपेक्षा जावयाचेच जास्त लाड होताना दिसतात.

- Advertisement -

सखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहतं, पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल, असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षकांवर तिच्या आईच्या जावयावरील प्रेम आणि श्रद्धेमुळे पाणी पडत. सहसा मुलींना सासुरवासाची भीती वाटते पण सखीला मात्र माहेरवास नकोसा झाला आहे. अशा आशयाचा एक प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या मालिकेत स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपुटकर, सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, पुयापूर्वी पुष्कराज आणि स्वानंदी या दोघांनी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांची अस्सं माहेर नको गं बाई ही मालिका येत्या ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -