घरमनोरंजनअजय देवगणच्या 'दृश्यम 2'चा नवा दमदार पोस्टर प्रदर्शित

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’चा नवा दमदार पोस्टर प्रदर्शित

Subscribe

अजय देवगणने नुकताच या चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे.सोबतच त्याने चाहत्यांना एक मोठा प्रश्न देखील विचारला आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘दृश्यम 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक देखील मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या पहिला सिक्वेलला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, अजय देवगणने नुकताच या चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे.सोबतच त्याने चाहत्यांना एक मोठा प्रश्न देखील विचारला आहे.

अजय देवगणने शेअर केला ‘दृश्यम 2’चा दमदार पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -

अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘दृश्यम 2’चा नवा पोस्टर शेअर करत त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारलाय की, “प्रश्न हा नाही की तुमच्या डोळ्यांसमोर काय आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही काय पाहता.” दृश्यमच्या पहिल्या सिक्वेलप्रमाणेच अजय देवगणचा हा प्रश्न देखील सस्पेंसने भरलेला आहे.

‘दृश्यम’ ने जिंकलं प्रेक्षकांचं मन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू दिसून आल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. दरम्यान, येत्या 17 ऑक्टोबर रोजी ‘दृश्यम 2’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

बॉलिवूडमधील कलाकारांवर बाबा रामदेव यांचे ‘टीकासन’

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -