घरमनोरंजनNew release : शुक्रवारी थिएटर आणि ओटीटीवर नव्या चित्रपटांची रेलचेल, कोणता ठरणार...

New release : शुक्रवारी थिएटर आणि ओटीटीवर नव्या चित्रपटांची रेलचेल, कोणता ठरणार सरस?

Subscribe

मुंबई : नव्या चित्रपटांच्या बाबतीत फेब्रुवारीचा पहिला शुक्रवार जवळजवळ रिकामाच गेला. बॉक्स ऑफिसवर दमदार नोंद करू शकेल, असा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आता या आठवड्यात काही नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. त्याच वेळी, थेट ओटीटीवर (OTT) देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकूणच या नव्या आठवड्यात मनोरंजनाची रेलचेल असणार आहे. यात कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

तेरी बातों में ऐसा उलझा जिया

गेल्या 25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनित फायटर चित्रपटाला सुरुवातीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण नंतर प्रेक्षकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. आता 9 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या शाहिद कपूरच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट, बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा आहे. हा एक रोमँटिक साय-फाय ड्रामा चित्रपट आहे, ज्याची कथा मानव आणि रोबोट यांच्यातील प्रेमावर आधारित आहे. या चित्रपटात शाहिद रोबोट कृतीच्या प्रेमात पडतो. 2022 मध्ये शाहीदचा ‘जरसी’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण ओटीटीवर मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

- Advertisement -

लाल सलाम

जेलरनंतर रजनीकांत आता आपल्या चाहत्यांना ‘लाल सलाम’ म्हणायला येत आहे. हा तमिळ चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चार दिवस आधी म्हणजे 5 फेब्रुवारीला याचा ट्रेलर समोर आला. हा चित्रपट त्याच्या शीर्षकामुळे आणि रजनीकांतच्या लूकमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे.

मिर्ग

मिर्ग हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक याच्यासह राज बब्बर, अनुप सोनी आणि श्वेताभ सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तरुण शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा एक थ्रिलर ड्रामा आहे.

- Advertisement -

भक्षक

शाहरुख खानच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचा हा चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे. ‘भक्षक’ चित्रपटामध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे, ज्याची कथा अनाथाश्रमातील मुलींवर होणाऱ्या बलात्काराचा पर्दाफाश करण्याच्या घटनेवर आहे. या चित्रपटात भूमी एका शोधपत्रकाराच्या भूमिकेत आहे.

लंतरानी

हा अँथॉलॉजी चित्रपट झी फाइव्हवर (ZEE 5) प्रदर्शित होत आहे. जितेंद्र कुमार, जॉनी लिव्हर आणि जिशू सेनगुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन गुरविंदर सिंग, कौशिक गांगुली आणि भास्कर हजारिका यांनी केले आहे.

याशिवाय, हिंदी चित्रपट खिचडी 2, तामिळ चित्रपट कॅप्टन मिलर, अयालन आणि तेलुगू चित्रपट गुंटूर कारम हे 9 फेब्रुवारी रोजी OTTवर प्रदर्शित होत आहेत. हॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे तर, द आयर्न क्लॉ हा चित्रपट 9 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शॉन डर्किन दिग्दर्शित, हा व्यावसायिक कुस्तीपटू केविन वॉन एरिचच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -