Ratris Khel Chale 3 : ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये नव्या शेवंताची एंट्री

New Shevanta entry in 'Ratris Khel Chale 3' ; apoorva nemalekar exit
Ratris Khel Chale 3 : ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये नव्या शेवंताची एंट्री

मराठी टेलिव्हिजनवरील रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, सुशल्या या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली.रात्रीस खेळ चाले चे दोन्ही पर्व जसे गाजले त्याचप्रमाणे तिसरे पर्वही अनेक रहस्यांचा उलघडा करत पुढे सरकत आहे.नुकतीच ‘वच्छी’ची एंट्री झाली आहे.मात्र,या मालिकेत आता मोठा बदल झाला आहे. हा बदल पाहून शेवंताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रात्रीस खेळ चाले मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्रीनंतर मालिकेने वेगळंच वळण घेतलं. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे. मात्र, शेवंताची भुमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता मालिकेतून एक्झिट घेणार असून,नव्या शेवंताची एंट्री होणार आहे. अभिनेत्री कृतिका तुळसकर शेवंताची भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने एक फोटो शेअर केला होता.या फोटोला तिने, ‘धीस लेडी चेंज माय लाईफ’ अर्थात ‘या स्त्रीने माझे आयुष्य बदलले’, असे कॅप्शन लिहिले आहे.  फोटोत मागील भिंतीवर ‘शेवंता’ची काही स्केच फ्रेम करून लावलेली आहे. ‘शेवंताची भुमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता मालिकेतून एक्झिट घेणार असून,अपूर्वाने घेतलेल्या निर्णयामुळे चाहत्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.२२ फेब्रुवारी २०१६मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

 


हे ही वाचा :Farm Law Repealed : तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय