घरमनोरंजन'अखियों से गोली मारे...', रिमेक गाणं प्रदर्शित!

‘अखियों से गोली मारे…’, रिमेक गाणं प्रदर्शित!

Subscribe

९० च्या दशकातील गाण्याचे रिमेक बनवण्याचा ट्रेंड अजूनही सुरुच आहे. त्यामध्ये आता आणखी एका गाण्याची भर पडली आहे. ते गाण आहे, अखियों से गोली मारे… गोविंदा आणि रविना टंडन यांच्यावर चित्रीत झालेले हो लोकप्रिय गीत पुन्हा एकदा नव्या ढंगात आणि नवीन कलाकारांसोबत आले आहे. पती, पत्नी और वो या आगामी चित्रपटाचे हे नवेकोरे गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून मिका सिंग याने हे गाणे गायले आहे.

- Advertisement -

कार्तिक आर्यन, भूमि पेडनेकर आणि अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षेत असणारा ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन ‘चिंटू त्यागी’ ही भूमिका साकारत असून अनन्या पांडे ‘तपस्या’ आणि भूमी पेडनेकर ‘वेदिका त्रिपाठी’ या भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा चित्रपट रोमँटिक-कॉमेडी ड्रामावर आधारलेला आहे. १९७८ साली ‘पति पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचाच रिमेक ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील व्यक्तिरेखांसारखेच यातील गाणे धम्माकेदार आहेत. हा चित्रपट अजीज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. तर या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि रेनू रवि चोपड़ा हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -