Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन परिपूर्ण सौंदर्याने नटलेले ‘वेल डन बेबी’चे नवीन गाणं प्रदर्शित

परिपूर्ण सौंदर्याने नटलेले ‘वेल डन बेबी’चे नवीन गाणं प्रदर्शित

हे नवे गाणे आणि याचे सुखद संगीत कौटुंबिक-नाट्य असलेल्या 'वेल डन बेबी' या कथेत अगदी उत्तम प्रकारे बसते.

Related Story

- Advertisement -

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा आगामी चित्रपट ‘वेल डन बेबी’ने आपला नवीनतम ट्रॅक ‘हलकी हलकी’ सादर केला आहे. एक परिपूर्ण सौंदर्याने नटलेले कर्णमधुर गाणे आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शनासाठी ‘वेल डन बेबी’ला केवळ काही दिवसांचा अवधी उरलेला आहे. यातच आता अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने चित्रपटाच्या आणखी एका नवीनतम गाण्याचे अनावरण केल्याने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ‘हल्की हल्की’ असे शीर्षक असलेले हे नवे गाणे आणि याचे सुखद संगीत कौटुंबिक-नाट्य असलेल्या या कथेत अगदी उत्तम प्रकारे बसते. याच्या लक्षवेधक व्हिडिओतील चमकदार सिनेमॅटोग्राफीसह या गाण्याचे बोल श्रोत्यांच्या हृदयाची अचूक तार छेडतात. ‘हल्की हल्की’ हा एक असा ट्रॅक आहे ज्याला प्रत्येक स्तरावरील श्रोते आपल्याशी जोडून घेऊ शकतील. रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत रोहन प्रधान यांनी गायले असून वलय मुळगुंड यांनी लिहिले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटाच्या पहिले गाणे ‘आई-बाबा’ला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे.‘वेल डन बेबी’ हा चित्रपट भारतातील प्राईम सदस्य 9 एप्रिल 2021 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील. चित्रपटाची कहाणी आधुनिक काळातील जोडप्याभोवती फिरत आहे, जे घटस्फोट घेणार आहेत, परंतु नशिबाने त्यांना आश्चर्यकारकरीत्या एका वळणावर आणून उभे केले आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि मर्मबंधा गव्हाणे लिखित, या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आनंद पंडित, मोहन नादर आणि पुष्कर जोग निर्मित आणि व्हिडीओ पॅलेसद्वारे सादर करण्यात येत आला आहे.


हे वाचा –  रोहित शेट्टीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यानी केले स्वागत

- Advertisement -