प्राजक्ता आणि पूर्वा करणार राडा, सामाजिक विषयावर नवा टॉक शो

सत्य परिस्थीती सांगणारा व्यंगात्मक शो मधून प्राजक्ता आणि पूर्वाच एक वेगळंच रूप तुम्हाला सामाजिक विषय हाताळताना पाहणे रंजक ठरणार आहे.

rada rada new talk show

बलात्कार संस्कृती ही जगाच्या जवळपास प्रत्येक भागात आणि प्रत्येक समाजात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. बलात्कार संस्कृती हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यतः पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते. पण संस्कृती हे केवळ सुंदर, रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या परंपरा आणि चालीरीतींचे नाव नाही. बलात्कार संस्कृती’ म्हणजे अशी सामाजिक व्यवस्था ज्यामध्ये लोक बलात्काराच्या पीडितेला पाठिंबा देण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या प्रकारे बलात्कार करणाऱ्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. बलात्कार संस्कृतीचा संदर्भ आहे ती परंपरा ज्यामध्ये बलात्कारासाठी स्त्रीला जबाबदार धरले जाते. ‘बलात्कार संस्कृती’ म्हणजे अशी संस्कृती ज्यामध्ये बलात्कार आणि महिलांवरील हिंसाचार या गंभीर गुन्ह्यांऐवजी किरकोळ आणि दैनंदिन घटना म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. (New talk show rada rada starring by prajkata mali and purva shinde)

हेही वाचा – आलिया लग्नाआधीच होती गरोदर? बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रींनी सुद्धा लग्नाआधी दिली होती गूड न्यूज

अशाच भारतीय बलात्कार संस्कृतीविषयी भाष्य करण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे व्हीमास मराठीचा राडा राडा या टॉक शो अंतर्गत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बलात्कार संस्कृतीला आळा घालण्यासाठी या अभिनेत्रींनी दिलेले सल्ले साऱ्या भारतीयांना नक्कीच मोलाचा संदेश देऊन जातील यात शंकाच नाही. प्राजक्ता आणि पूर्वा व्हीमास मराठीच्या राडा राडा या शो अंतर्गत प्रेक्षकांना सामाजिक विषय कसा हाताळायचा याचे उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. व्हीमास मराठीचा राडा राडा हा शो प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन चालू विषय हाताळणार असून नवनव्या कलाकारांचे, विचारवंताचे मत या प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांना कळणार आहे.

हेही वाचा – Prajaktta Mali Post : ‘लहान तोंडी मोठा घास, पण.. ; प्राजक्ता माळीची राज्य सरकारला कळकळीची विनंती