घरमनोरंजननववधू दीपिका बॅक ऑन 'फिटनेस'

नववधू दीपिका बॅक ऑन ‘फिटनेस’

Subscribe

लांब सडक उंची आणि फिटनेसमुळे दीपिकाचे अनेक चाहते आहेत. नुकतीच ती लग्नाच्या बेडीत अडकली. नेहमीच जीमला जाणारी दीपिका एक दिवसही जीम मिस करत नाही.

‘शादी का लड्डू’ खाऊन दीपिका आणि रणवीर ही दोघेही कामाला लागले आहेत. रणवीर सध्या त्याचा आगामी सिनेमा सिंबाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तर सध्या ब्रेकवर असलेली दीपिका पुन्हा परतण्याच्या तयारीला लागली आहे, असेच काहीसे दिसत आहे. कारण तिचा एक फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता दीपिका लवकरच सिनेमात तिच्या हॉट आणि सिझलींग अवतारात दिसेल, असे वाटत आहे.

असा आहे ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर

फिटनेस फ्रिक दीपिका

दीपिका या व्हिडिओमध्ये प्लायोमेट्रिक स्किल्स व्यायाम करत आहे. हा व्यायाम गती आणि जलदपणावर अवलंबून असतो. हा व्हिडिओ फिटनेस ट्रेनर नमने शेअर केला असून या आधी देखील दीपिकाचे अनेक फोटो नमसोबत आहेत. व्हाईट टीशर्ट- ब्लॅक पँटस आणि व्हाईट शूजमध्ये दीपिका दिसत आहे.

- Advertisement -

कधी परतणार दीपिका ?

लांब सडक उंची आणि फिटनेसमुळे दीपिकाचे अनेक चाहते आहेत. नुकतीच ती लग्नाच्या बेडीत अडकली. नेहमीच जीमला जाणारी दीपिका एक दिवसही जीम मिस करत नाही. पण लग्नाच्या गडबडीत तिचे जीम मिस झाले होते. लग्नाच्या आदल्या दिवशीही ती जीममध्ये होती,अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पण आता दीपिका कोणत्या सिनेमात दिसेल याची चर्चा होऊ लागली आहे. पण अद्यापही या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाहीए त्यामुळे फॅन्सला नव्या घोषणेपर्यंत थांबावे लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

#SELF @selfmagazine #January #February

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -